रिपाइं (आठवले) च्या वतीने तुळजापूर येथे महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह वर्धापन दिन साजरा
——————————————————-
नळदुर्ग (एस.के. गायकवाड):
सबंध मानवजातीस सार्वजनिक पानवट्यावर पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे या मानवी हक्काच्या मागणीसाठी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या महाड येथील चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह केला.या ऐतिहासिक घटनेला ९९ वर्षे पूर्ण होत असून महाड येथिल चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दीपूर्व वर्धापन दिनानिमित्त तुळजापूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने आभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
. देशातील तमाम बहुजनांना सार्वजनिक पाणवठ्यावर पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे या मानवी हक्काच्या मागणीसाठी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या पायथ्याशी वसलेल्या महाड येथील चवदार तळ्याच्या पाण्याचा ऐतिहासिक सत्याग्रह महामानव डॉ. बाबासाहेब आबेडकर यानी दि.२० मार्च १९२७ रोजी केला. या ऐतिहासिक सत्याग्रहास ९९ वर्ष पूर्ण होत असून सत्याग्रहाच्या या शताब्दी पूर्व वर्धापन दिनाचे औचित्य साधून तुळजापूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णा कृती पुतळ्यास रिपाइं (आठवले) चे धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब म्हस्के,जिल्हा सचिव एस.के.गायकवाड यांच्या
हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व चवदार तळे सत्याग्रहाचा जय जयकार करत महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाचा वर्धापण दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे
मराठवाडा प्रदेश कार्याध्यक्ष आनंद पांडागळे,तुळजापूर शहराध्यक्ष वैजिनाथ पांडागळे, रिपाइं ओबिसी अघाडीचे शहराध्यक्ष लहू घोडके,भिमराव सोनवने, महादेव सोनवने,किरण कदम, विनोद भालेकर, बळी जाधव सह कार्यकर्ते उपस्थित होते.






