आजी आजोबांच्या प्रेमळ सहवानेच मी कविता लिहू शकलो… कवी शंकर कसबे
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, त्यांच्यात साहित्याची गोडी निर्माण व्हावी आणि बालसाहित्याचा व्यापक प्रसार व्हावा या उदात्त हेतूने वाळुंज (ता. आष्टी, जि. बीड) येथे सोमवार, दि. २३ मार्च २०२६ रोजी भव्य बालसाहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले. भैरवनाथ मंदिरासमोरील प्रशस्त परिसरात पार पडलेल्या या एकदिवारीय संमेलनात ग्रंथदिंडीपासून काव्यवाचन, कथाकथन, मुलाखती आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समृद्ध मेळा पाहायला मिळाला. या संमेलनाचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्या सहकार्याने तसेच शरद पवार इन्स्पायर फेलोशिप २०२५ अंतर्गत करण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम विशेष प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक ग्रंथदिंडीने झाली. गावातील मान्यवर, विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. या दिंडीमधून साहित्यप्रेमाचा संदेश देण्यात आला.
संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सौ. प्राजक्ताताई सुरेश (अण्णा) धस या होत्या, तर संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवी डॉ. कैलास दौड यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. उद्घाटक म्हणून शिक्षण विभाग प्रमुख योगेश कुदळे तसेच संदीप पवार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. वाळुंज शाळेच्या बालचमूने आज तुमच्याच स्वागताला हे गीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले.
या प्रसंगी कवी हनुमंत चांदगुडे (बारामती) यांनी आळाशी या कवितेचा अर्थ उलगडून दाखवला, कवी शंकर कसबे (तुळजापूर) यादोघांची विशेष उपस्थिती होती.
कवी-शंकर कसबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ग्रामीण जीवन , ग्रामीण भागातील शाळा आजी आजोबा यांच्या विषयी जाणिव जागृती निर्माण करून आजीच्या गितामधील संदेश विद्यार्थ्यांना देताना ते गीत गाईले ‘कष्ट करावे, पोट भरावे हित त्यात तुमचे… यातून प्रत्येक व्यक्तीला स्वतः चे अस्तित्व टिकविण्यासाठी कष्टाला पर्याय नाही…त्याच बरोबर आजीआजोबा आणि नातवंडांच्या प्रेमामुळेच त्यांना कविता लिहिता आली असेही त्यांनी सांगितले.. आजी नसती तर मी कविता लिहिली असती की नाही असेही ते म्हणाले.त्याच बरोबर ‘तसा हुशार नव्हतो साळतं’ व ‘ माझ्या आल्यानंतर पंज्यानं ‘ या कवितांचे गायन करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विठ्ठल जाधव, श्रीम. मनीषा सातपुते, श्रीम. शितल शिंदे, किशोर सोले, मारुती पठाडे, महेश शिंदे, श्रीम. सुनीता उगले, सुरेश पवार, सोगनाथ वाळके, प्रा. सय्यद अल्लाउद्दीन, वि. भा. साळुंके, अजय घोडके, केतन पाटील, प्रा. मिलींद काटे, गौतम आजबे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सरकार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हरिष हातवटे यांनी केले.
स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना ती. प्राजक्ताताई सांगितले की, साहित्यिकांमुळेच जगाला मानवी जीवनाचा अर्थ सांगणारी साहित्यसंपदा मिळाली आहे. आमच्या पिढीला मिळालेल्या बालसाहित्यातूनच आमचे व्यक्तिमत्त्व घडले. त्यांनी अनेक साहित्यिकांच्या कार्याचा आढावा घेतला. अशा संमेलनांमुळेच मुलांचे सर्वांगीण जडणघडण होते, असे त्यांनी नमूद केले. तसेच .अध्यक्षीय मनोगतात डॉ. कैलारा दौड म्हणाले, विचारांचा जागर झाला पाहिजे. मुलांची विचारशक्ती जागृत करणे अत्यंत आवश्यक आहे, ज्या विचारांना भंग नाही तोच अंभग आहे. साहित्य संमेलनातून विचारांची पेरणी होते.






