विनायकराव पाटील यांच्या देहत्याग अंदोलनात आण्णा हजारे यांची सरकार सोबत मध्यस्थी !
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
जेष्ठ समाजसेवक तथा शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी सरकारने केलेल्या कर्जमाफी विरोधात सरकारला २३ मार्च रोजी देहत्याग करण्याचा ईशारा दिला होता. अखेर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्याशी बोलणी करून देण्याचे आश्वासन देऊन विनायकराव पाटील यांच्या देहत्याग अंदोलनास सरकार मध्यस्थी केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाच्या वतीने शेतकरी कर्ज माफीची घोषणा करण्यात आली. सदरची शेतकरी कर्ज माफी हि फसवी व शेतकऱ्याची दिशाभूल करणारे असल्याची सांगून शेतकरी कर्जमाफी च्या विरोधात पाटील यांनी २३ मार्च रोजी देहत्याग अंदोलन करण्याचे निवेदन शासनाला दिले होते. दरम्यानच्या कालावधी मध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा शुभम केदारी यांनी पाटील यांना देहत्याग करू नये या करिता विनंती केली.
२८ मार्च रोजी विनायकराव पाटील व शुभम केदारी यांनी राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सरकारने केलेल्या चुकीच्या कर्जमाफी बाबत शासनाला तथा मुख्यमंत्री व सचिव प्रविणसिंह परदेशी यांना बोलण्याची विनंती केली. अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री व प्रविणसिंह परदेशी यांच्याशी शेतकरी कर्जमाफी संदर्भात बोलणी करून मध्यस्थी केली.
कर्ज माफी ऐवजी शेतकऱ्यांना भावांतर योजना लागू करावी. कर्जमाफी संदर्भाने नेमलेल्या उपसमितीचा अहवाल तात्काळ देण्यात यावा या सह आदि मागण्या बाबत विनायकराव पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी कर्जमाफी प्रकरणी अण्णा हजारे आक्रमक असल्याचे पाटील यांनी सांगितले.







