जवळगा (मेसाई ) येथे विज कोरुळून दोन म्हशी व एका बैलाचा मृत्यू
————————————————–
नळदुर्ग (एस. के. गायकवाड ) :
तुळजापूर तालुक्यातील जवळगा (मेसाई ) येथील शेत शिवारातअसलेल्या सुभाष दामू मस्के यांच्या शेतात मंगळवार दि.०१ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११.oo वा. सुमारास वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह
झालेल्या अवकाळी पावसामुळे वीज कोसळून झाडाखाली बांधलेल्या दोन म्हशी व एका बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून अवघ्या पन्नास ते साठ फूट अंतरावर वास्तव्यास राहत असलेले मस्के कुंदब सुदैवाने वाचल्याने मनूष्यहानी होण्याचा मोठा अनर्थ ठळला आहे.
. जवळगा (मेसाई) येथील सुभाष दामू मस्के हे आपल्या कुटुंबासह मालकी हक्काच्या शेतात राहतात.शेती व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.शेतीला जोड धंदा म्हणून त्यांनी दोन म्हशी पाळलेल्या होत्या.म्हशीच्या दुधापासून थोडी फार आर्थिक मदत त्याना मिळत होती.त्याचं
बरोबर त्यांनी एक बैल ही पाळला होता.बघत बघत आर्थिक तरतूद करून दुसरा बैल खरेदी करून बैल जोडीच्या माध्यमातून शेतीची मशागत करून शेती व्यवसाय सुधारण्याचे त्यांचे स्वप्न होते. परंतु त्यांच्या या स्वप्नावर निसर्गाचा कोप झाला.
दि.०१ एप्रिल २o२६ रोजी रात्री ठीक ११.०० वाजण्याच्या दरम्यान अचानक वादळी वारा विजेच्या कडकडाट सह पाऊस सुरू झाला. या वेळी लिंबाच्या झाडावर विज कोसळली आणि लिंबाच्या झाडाखाली बांधलेल्या दोन म्हशी व एक बैल जागीच मृत्यू पावले. या ठिकाणाहून अवघ्या पन्नास ते सात फुट अंतरावर ते वास्तव्य करत असलेल्या घरास विजेची झळ पोचली नाही. त्यामुळे एक मोठी मनुष्य हानी होण्याचा अनर्थ टाळला.या घटनास्थळाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के व ग्रामस्थांनी भेट देऊन पाहणी करून सुभाष मस्के याना मानसिक आधार देवून शासनाने सदर घटनेची नोंद घेऊन रीतसर पंचनामा करून नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान पावलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी रिपाइं (आठवले) चे धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के सह ग्रामस्थांनी केली आहे.
सदर दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.








