Best News Portal Development Company In India

शेतकरी नेते विनायकराव पाटील यांच्या शेतकरी कर्जमाफीला अखेर यश ! उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.

शेतकरी नेते विनायकराव पाटील यांच्या शेतकरी कर्जमाफीला अखेर यश !

उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.

जेष्ठ समाज सेवक तथा शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी शासनाने केलेल्या चुकीच्या कर्ज माफी बद्दल देहत्याग अंदोलन केले होते. अखेर पाटील यांच्या शेतकरी कर्ज माफीच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तीय सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी मान्य केल्या आहेत. त्यांनी केलेल्या सुधारित कर्जमाफी समितीत पाटील यांनी सुचित केलेल्या मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. अखेर विनायकराव पाटील यांच्या शेतकरी कर्जमाफी मागण्यांना मोठे यश आले आहे.
शासनाच्या वतीने अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. शासनाने केलेली कर्जमाफी हि फसवी असल्या बाबत २३ मार्च रोजी देहत्याग अंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिला होता. दरम्यानच्या काळात जेष्ठ समाज सेवक आण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली होती. सुधारित कर्जमाफी करिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन एक एप्रिल रोजी निवेदन देण्यात आले होते. मुख्यमंत्री व आण्णा हजारे यांच्या सुचने वरून सात एप्रिल रोजी शेतकरी कर्जमाफी उपाय योजना समितीचे अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी यांच्या कडे सुधारित कर्ज माफीचा अवाहल सादर केला होता.
मध्यम मुदतीचे व दोन दोन लाखा पेक्षा जास्त असलेले थकित पीक कर्ज माफ करावे. शेतकऱ्यांना भावांतर योजना लागू करावी. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा. खते,बि – बियाणांच्या किंमती नियंत्रणात ठेवाव्यात , दुधाला योग्य भाव द्यावा , पीक विम्या मध्ये बदल करून शेतकऱ्यांच्या पिकांना शाश्वत पीक विमा नुकसान भरपाई देण्यात यावी या सह आदि मागण्यांचा प्रस्ताव शासनाकडे सुपूर्द करण्यात आला होता.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तीय सचिव तथा शेतकरी कर्जमाफीचे अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी यांनी पाटील यांच्या प्रस्तावाची तातडीने दखल घेतली. १० एप्रिल रोजी एका स्वतंत्र पत्राद्वारे विनायकराव पाटील यांच्या सर्व मागण्यांचा प्रस्ताव स्वीकारल्याचे पत्र त्यांना देण्यात आले.
आठ एप्रिल पासून पाटील यांनी कवठा येथे आमरण उपोषण सुरू केले होते. आज शनीवारी पाटील यांच्या मागण्या शासनाने मान्य केल्याने त्यांचे उपोषण सोडविण्या करिता उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, पोऊनि रामहरी घाटे, यांच्या सह विजयकुमार सोनवणे , व्यंकटराव सोनवणे, विकास पाटील , प्राचार्य डॉ. दिलीप गरुड यांनी उपोषण सोडविण्यासाठी प्रयत्न केले. उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे व उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते शरबत घेऊन पाटील यांनी उपोषण मागे घेतले. राजेंद्र सोनवणे , रमेश माने, संदीप माने , राजेंद्र माने , अतुल सोनवणे , मलंग गुरुजी , भरत सोनवणे , संदीप माने सह परिसरातील शेतकरी , ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
विविध शेतकरी संघटनांच्य तुलनेत शासनाने पाटील यांच्या शेतकरी कर्ज माफी भावांतर योजना , उत्पादीत मालाच्या खर्चावर शेती पिकांचे दर या विविध मागण्यांचा कर्जमाफी समिती मध्ये गांभीर्याने विचार करून समावेश करून घेतल्या बद्दल शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india