डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचा पुढाकार.
मुरूम येथे कर्तृत्ववान भिमपुत्रांचा स्नेहमेळावा व गौरव.
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
उमरगा तालुक्यातील मुरूम परिसर शेती साठी प्रसिद्ध आहे. या भागातील काळ्या मातीने केवळ शेतीच पिकवली नाही, तर प्रशासनाला अनेक कर्तृत्ववान अधिकारीही बहाल केले आहेत.प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शहरातील भीमनगर या दलित वस्तीतून वर्ग एक व वर्ग दोनचे तब्बल४७अधिकारी घडले असून राज्याच्या उच्च प्रशासकीय सेवेत मारलेली ही झेप आजच्या पिढीसाठी यशाची ब्लु प्रिंट ठरत आहे.यानिमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने मंगळवारी (दि .२९) सायंकाळी अधिकारी व कर्मचारी यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते या कर्तृत्ववान भिमपुत्रांचा गौरव करण्यात आला.
निवृत्त साखर सहसंचालक डी आय गायकवाड अध्यक्षस्थानी होते.यावेळी नगराध्यक्ष बापुराव पाटील,राजस्थानच्या राज्यपालांचे विशेष कार्यअधिकारी राजकुमार सागर,अप्पर निबंधक राजेश सुरवसे,बीपीसीएलचे निवृत्त चीफ मॅनेजर सिद्धेश्वर भालेराव,मुंबई विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख दत्तात्रय मुरूमकर,कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक अशोक गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बोधिसत्व गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यानंतर मान्यवरांच्या हस्ते जयंती मंडळाच्या पुढाकाराने काढण्यात आलेल्या “यशस्वी शिलेदार” या स्मरनिकेचे प्रकाशन करण्यात.यावेळी डी आय गायकवाड,राजकुमार सागर,राजेश सुरवसे,सिद्धेश्वर भालेराव,प्रा दत्तात्रय मुरूमकर,अशोक गायकवाड यांनी डॉ आंबेडकर शहर वाचनालयाचा उल्लेख करून जुन्या आठवणींना उजाळा देत उपस्थित युवकांना स्पर्धा परीक्षा,नौकरीच्या संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मदन गायकवाड यांनी प्रस्तावित करून आभार मानले.जयंत गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नगरसेवक रुपचंद गायकवाड,उपाध्यक्ष अमोल बनसोडे,कोषाध्यक्ष प्रा अण्णाराव कांबळे,सचिव आनंद गायकवाड,प्रशांत गायकवाड,राहुल गायकवाड, अभिजित कांबळे,प्रबुद्ध गायकवाड,प्रशांत मुरूमकर,प्रवीण गायकवाड, प्रा साधू गायकवाड, दिनेश भालेराव,अजिंक्य गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले.
चौकट
*मुरूमची भीमनगर म्हणजे हिऱ्यांची खाण*
यावेळी बोलताना माजी मंत्री बसवराज पाटील म्हणाले की,मुरूम शहरातील भीमनगर येथून वर्ग एक व वर्ग दोनचे तब्बल 47 अधिकारी घडले याचा समस्त मुरूमकरांना अभिमान आणि गर्व आहे.आज या वस्तीतील अनेक युवक युवती उच्चशिक्षण घेऊन प्रशासकीय अधिकारी म्हणून आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत.म्हणूनच मुरूमच्या भीमनगरची ओळख अधिकाऱ्यांची खाण म्हणून निर्माण झाली आहे.खऱ्या अर्थाने भीमनगरला अधिकाऱ्यांची खाण म्हणावे लागेल असे सांगत यापुढील काळात शिक्षण, समता व बंधुता या मूल्यांना अधिक सक्षम करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वसमावेशक व भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली.







