लोहारा तालुक्यातील विविध गावात विविध योजनेचे शरण पाटील यांच्या हस्ते शुभारंभ.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
लोहारा तालुक्यातील मौजे हिप्परगा सय्यद येथे द.प्राईड इंडिया (स्पर्श)सास्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत ग्राम प्रकल्पाद्वारे,सिंमेट बंधारा कामाचा शुभारंभ कार्यक्रम शरण पाटिल यांच्या हस्ते संपन्न .
“शाश्वत ग्राम प्रकल्पाद्वारे”, हिपरगा सय्यद,उदतपूर,मुर्शदपूर,तोरंबा या चार गावात सिंमेट बंधारे व शेततळे,नाला सरळीकरण,नाला ब्लडिंग,शेततळे,विहीर दुरूस्ती,बांध बंधिस्त,१ हजार अल्पभूधारक शेतकरी बांधवाच्या उत्पन्नात वाढ म्हणून वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.तसेच “स्पर्श रूग्णालय सास्तूर प्रकल्प संचालक डाॅ.रमाकांत जोशी यांचे कार्य खूप प्रेरणादायी असून अनेक उपक्रम आजवर राबविले..”
या कार्यक्रमास स्पर्श रूग्णालय प्रकल्प संचालक डाॅ.रमाकांत जोशी,ओंकार भोरे,जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, योगेश राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य गुड्डू अण्णा भुजबळ, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय वाघमारे, नागनाथ पाटील, पंचायत समिती माजी सभापती बुद्धिवंत साखरे, पंचायत समिती माजी सभापती ॲड. श्री. विश्वनाथ पत्रिके, सरपंच श्रीशेल्य ओवांडे, उपसरपंच गुरुनाथ यादव, विलासपूर पांढरी सरपंच मारुती कार्ले, वडगाव वाडी सरपंच अंकुश भुजबळ, तंटामुक्ती अध्यक्ष आदिनाथ भोजराव तसेच गणेश वाकडे, सुजित शेळके, बालाजी वडजे, राजू मुल्ला, अतुल जाधव, दत्ता बिराजदार, मुबारक कारभारी, विजय सोनकटाळे, ब्रम्हानंद पाटील, चाँद कारभारी, जगदीश पाटील, संतोष यादव यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे जलसिंचन क्षेञात भरीव वाढ होऊन शेतकरी बांधवास खूप फायदा होईल शेतकऱ्यांसाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.








