जळकोट येथील शेतरस्ते कामातील झालेल्या भ्रष्टाचार बाबत शेतकऱ्यांचे साखळी उपोषण
– – – – – – – – – – – – – – – – – – –
समंधीत लोकप्रतिनीधी व भ्रष्ट आधिकाऱ्याची चौकशी व्हावी
दोषीवर कडक कार्यावाही व्हावी
शेतकऱ्यानी केली मागणी
– – – – – – – – – – – – – – – – – – –
जळकोट (अरुण लोखंडे ) तुळजापूर तालुक्यातील जळकोट शिवारात झालेल्या शेतरस्ते मजबूती करण्या कामात लाखो रुपयाचा भ्रटाचार झाला असून भ्रष्टाचार करणारे लोकप्रतिनिधी आणि समधीत आधिकाऱ्यावर कार्यवाही व्हावी म्हणून येथील ग्रामपंचायत समोर शेतकऱ्याचे साखळी उपोषण .
याबाबत प्राप्त माहिती अशी की जळकोट येथील शिवारात मनरेगा अंतर्गत सन २०२१ आणि 2022 शेतरस्ते मजबूती करणासाठी मजुरी मिळाली होती त्यामध्ये कोळनुर पांढरी शिव रस्ता ते आडवाट रस्ता दोन कि.मीटर तर , जळकोट बोरमन तांडा ते जळळोटवाडी (नळ) शेतरस्ता दोन किलो मिटर व मुर्टा रस्ता ते वाडयावरची आई शिवरस्ता ) व तसेच जळकोट ते हंगरंगा (नळ) डांबरीकरण ते नारायण पटणे याच्या शेताकडे जाणारा शेत रस्ता दोन किलो मीटर वरील सर्व कामे मंजुर होऊन पूर्ण झाल्याचे दाखवून संपूर्ण कामाचा निधी हाडप करण्यात आला आहे . असे उपोषण कर्त्या शेतकऱ्याचे म्हणणे आहे पण मात्र प्रत्यक्षात एक ही काम पूर्ण झाले नाही या कामी गावातीलच मजुर या कामावर दाखविण्यात आले ज्या मजुरानी काम केले म्हणून त्याच्या खात्यावर पैसे टाकण्यात आले त्याना माहीत नाही की आम्ही हे काम केलेल नाही पण त्या मजुरांना चिरी मिरी देवून त्याचे खात्यावरील पैसे त्याचाकडून कडून घेतले आहे असा आरोप निवेदन कर्त्याचा आहे . वरील रस्ते पूर्ण न करता रस्ते पूर्ण झाल्याचे दाखवून लोकाकडून लोकवाटा वर्गणी जमा करून घेण्यात आला आहे पण त्याची नोंद ग्रामपंचायतच्या नोदवहीत नोद घेतली नाही सदरील प्रकरणी दिनांक २७ मार्च रोजी धाराशिव जिल्हाधिकारी व परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन दिले असता त्यांनी यावर कोणात्याही प्रकारची चौकशी समीती नेमली नाही . पण दिनांक ४ मे रोजी पंचायत समीतीचे कृषी आधिकारी अशोक काळे साहेब यानी शेतकऱ्या समवेत काही शेत रस्त्याची पाहाणी केली आहे मात्र त्यांनी ठोस असे काही शेतकरी बांधवाना सागितले नाही . म्हणून शेतकऱ्याच्या शेत रस्त्यावरील माती खाणाऱ्या आधिकारी व लोकप्रतिनिधी याची चौकशी व्हावी व समधीत रस्ते हे पावसाळ्या पूर्वी तयार करून शेतकऱ्याची व पशुपालकाची होणारी गैरसोय थांबावी याकरिता येथील शेतकरी बांधव हे साखळी उपोणाला बसले आहेत . जर शासनानाने आमच्या उपोषणाची दखल घेवून वेळेत काम पूर्ण केले नाही तर आम्ही सर्व शेतकरी जलसमाधी अंदोलन करणार आहोत आणि आमची संपूर्ण जनावरे ही पंचायत पुढे आणून बांधणार आहोत असे उपोषण कर्ते शेतकरी रोहीत कदम यानी सांगितले आहे सदरच्या निवेदनावर शंभर शेतकऱ्यांच्या सह्या असून सर्व शेतकऱ्यांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे







