Best News Portal Development Company In India

कवठा पाटीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत लातूरच्या तरुणाचा जागीच मृत्यू!

कवठा पाटीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत लातूरच्या तरुणाचा जागीच मृत्यू!
तुळजापूर प्रतिनिधी :- वाहन चालकांनी आपल्या जीवाची आणि इतर जीवाची सुद्धा काळजी करणे गरजेचे आहे कुठलेही व्यसन न करताअत्यंत काळजीपूर्वक व प्रसंग अवधानाने आपले सेवा कार्य करावे . हायगईने आणि निष्काळजीपणे ट्रक चालवून एका दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात लातूर येथील एका २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात २८ एप्रिल रोजी मध्यरात्री उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कवठा शिवारात घडला.
​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवन राजेंद्र धायगुडे (वय ३०, रा. सम्राट चौक, लातूर) आणि त्यांचे मित्र किरण हनुमंत गायकवाड (वय २७, रा. शासकीय कॉलनी, लातूर) हे दोघे २८ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास महिंद्रा सुप्रो गाडीने (मोटारसायकल) जात होते. कवठा शिवारातील कवठा पाटीजवळ आले असता, पाठीमागून येणाऱ्या ट्रकने (क्रमांक: TS 08 UE 3336) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
​हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये किरण गायकवाड हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत पवन धायगुडे हेदेखील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
​या प्रकरणी ५ मे २०२६ रोजी पवन धायगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
​ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) सह मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
​फरार किंवा दोषी ट्रक चालकावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पोलीस करत आहेत.
​महत्त्वाची टीप- रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण पाहता वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे आणि सुरक्षिततेचे नियम पाळणे गरजेचे झाले आहे. एका निष्काळजीपणामुळे लातूरच्या एका हसत-खेळत्या कुटुंबाचा आधार हिरावला गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.अपघातग्रस्तंना मदत करणे हे आपल्या आद्य कर्तव्य आहे हे सुजाण नागरिकांनी लक्षात घ्यावे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india