*कसगी आणि तुरोरी येथील उपोषण, आंदोलने म्हणजे सर्वसामान्य माणसांची असहाय्यता…*
तुरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.
*प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अजून किती दिवस बघ्याची भूमिका घेणार?*
उमरगा तालुक्यातील कसगी येथे पानंद रस्त्याच्या मागणीसाठी शेतकरी मागील तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. एका गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता मिळावा, एवढीच त्यांची साधी मागणी आहे. पण या साध्या मागणीसाठीही त्यांना उपोषण करावे लागत असल्याने हा केवळ एखाद्या रस्त्याचा प्रश्न राहत नाही; तर तो आपल्या संपूर्ण स्थानिक प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा विषय ठरतो.
ग्रामपंचायतीने केलेल्या चुकीच्या अतिक्रमणामुळे हा पानंद रस्ता अडवला गेला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. परंतु या सगळ्या प्रकारात सत्य काय, चूक कुणाची, आणि न्याय कुणाला हे शोधण्याऐवजी संपूर्ण यंत्रणा जणू शांतपणे बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र दिसते आहे.
ग्रामपंचायतीची चूक बाहेर पडू नये म्हणून प्रशासन स्तब्ध आहे, अशी भावना उपोषणकर्त्यांमध्ये निर्माण होणे हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. कारण प्रशासनावरचा विश्वास एकदा ढासळला की लोक शेवटी आंदोलन, उपोषण आणि संघर्षाचाच मार्ग स्वीकारतात. दुर्दैवाने आज नेमके तेच घडताना दिसत आहे.
याच वेळी तुरोरी येथे एक वयोवृद्ध जोडपे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीविरोधात आमरण उपोषण करत आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात शांतपणे जगण्याचा हक्क असलेल्या त्या वृद्ध दाम्पत्याला न्यायासाठी उन्हात बसावे लागत असेल, तर ती केवळ त्यांची वैयक्तिक वेदना नसून व्यवस्थेच्या कठोर आणि असंवेदनशील चेहऱ्याची साक्ष आहे.
लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ निवडणुकीच्या काळात मत मागणारे चेहरे नसतात. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, तहसील प्रशासन, वीज वितरण कंपनीचे अधिकारी या सर्वांची जबाबदारी केवळ फाईली हलवणे नसून लोकांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि वेळेवर न्याय देणे ही आहे.
उपोषणकर्त्यांकडे फिरकूनही न पाहणे, त्यांच्या मागण्या ऐकून न घेणे किंवा त्यांना राजकीय चष्म्यातून पाहणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
आज प्रश्न एवढाच आहे की, एखाद्या सामान्य शेतकऱ्याला किंवा वृद्ध जोडप्याला न्याय मिळवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची वेळ का यावी? प्रशासनाला जाग येण्यासाठी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावण्याची वाट पाहावी लागणार आहे का?
लोकशाहीमध्ये आंदोलन हा शेवटचा मार्ग असतो. जेव्हा संवाद संपतो, तेव्हा उपोषण सुरू होते. आणि जेव्हा उपोषणाकडेही दुर्लक्ष होते, तेव्हा समाजाच्या मनात व्यवस्थेविषयीचा राग आणि अविश्वास वाढू लागतो.
कसगी आणि तुरोरी येथील ही दोन्ही आंदोलने केवळ स्थानिक प्रश्न नाहीत; तर ती ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाच्या असहायतेची प्रतीके आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून उपोषणकर्त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, संवाद साधावा आणि न्याय्य तोडगा काढावा, अशी अँड.शीतल शामराव चव्हाण यांनीअपेक्षा व्यक्त केली आहे.
तुरोरी ,मुळज मोड ,येथे विद्युत पुरवठा सबस्टेशन असुन या सबस्टेशन च्या माध्यमातून जवळपास १५ ते १६ गावास विज पुरवठा होत असतो परंतु गेल्या अनेक दिवसांपासून शेतीसह ग्रामीण भागातील गावांना व्यवस्थित विज पुरवठा होत नसल्याने विज ग्राहकांना नाहक त्रासास सामोरे जावे लागते असुन २४ तासातुन ग्राहक पुरवठा फक्त रात्र दिवस पाहता ६ते ८ तास विज पुरवठा होत असल्याने उनाची वाठती दाहकता होत असताना वारंवार विज खंडीत होत असते शासनाकडून अती उष्मघाताचा सल्ला दिला जात असताना फँन,कुलर वापरण्यासाठी प्रसार माध्यमातून कळविले जात आहे त्यात विज खंडित होण्याचा रात्रंदिवस ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे वयोवृद्ध व्यक्ती व नवजात लहान बालके यांच्या जिवीतास उष्णतेमुळे अती त्रास सहन करावा लागत असताना येथील सबस्टेशन चे सहाय्यक अभियंता भोसले मात्र मुग गीळुन गप्प का आहेत हा प्रश्न ग्रामीण भागातील ग्हकांना भेडसावत आहे अनेक गावात पिठाच्या गीरण्या मीरचीकांडप कडबाकुट्या,व अनेकांचे अकडे वीना विज कनेक्शन शीवाय चालु असताना भोगे वायरमन यांच्या माध्यमातून अनेकांना अभय मीळते आहे आकडे टाकणार्या कडुन भोगे यांना मलीदा मीळुन भोसले यांच्यापर्यत पोंहंचत आहे का असा सववाल जनतेतुन सवाल केला जातो आहे. आष्टा (जहागीर) येथे तर लाईनमन च्या सेवेच्या बाबतीत एका हेल्पर द्वारे काम केले जाते आहे लाईनमन च्या सेवेबद्दल आष्टा( जहागीर) काम करण्यासाठी असमर्थ ठरत असताना वेळोवेळी डि.पि.चा फ्युज जाने ,डी.ओ जाने हा प्रकार दररोज दिवसेंदिवस वाढत जावुन पुर्ण गावास विज पुरवठ्यासाठी एकच डि.पी.असल्याने तोही वीना किटकँटचा त्यामुळे अकडे विना कनेक्शन विज वापरामुळे विज पुरवठा व्यवस्थित होत नसुन वारंवार वीज पुरवठा खंडित समस्येचा सामना करावा लागत आहे.
तरी जनतेच्या विज पुरवठा बाबत अनेक समस्याकडे जिल्हा प्रशासनाने वेळीच आळा घालण्यासाठी लक्ष घालण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी, जनता ग्राहक यांची मागणी जोर धरत आहे.







