तुगाव येथील बौद्ध थरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे.
आंबेडकरी अनुयायांनी उपविभागीय अधिकारी याना देण्यात आले निवेदन.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
तालुक्यातील तुगाव येथील बौद्ध तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या अरोपीस पकडण्यासाठी विलंब होत असल्याने रस्ता रोको अंदोलन करण्याबाबत चे उपविभागीय अधिकारी यांना (दि.२७ )रोजी निवेदन सादर.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,दि.१८ मे २०२६ रोजी मौजे तुगाव तालुका उमरगा येथिल बौद्ध तरुण भालचंद्र चोखोबा कांबळे या तरुणास शेतात नेहुन द्राक्ष बागेच्या लोखंडी पोलला बांधून बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी दि.१९ मे २०२६ रोजी ४:१० वाजता मुरुम पोलिस ठाणे येथे रोहित जोमदे,पंकज जोमदे,महेश जोमदे ,चँद फकिर,यांच्या विरोधात रितसर एफ.आय.आर.दाखल करण्यात आला आहे मात्र यातील एक अरोपी पोलिसांनी पकढला असुन उर्वरित तिन अरोपी फरार असुन सदर जातियवादी गावगुंड अरोपीस तात्काळ अटक करण्यात यावे अन्यथा २९मे रोजी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर समस्त आंबेडकरी जनतेच्या वतिने राष्ट्रीय महामार्गावर भारतरत्न डॉ .बाबासाहेब यांच्या पुतळ्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
सदरचे अरोपी हे गावगुंड प्रव्रत्तीचे असुन फिर्यादी कुटुंबाला त्याच्यापासुन धोका होवू शकतो या कामी प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे अशी निवेदनात मागणी करण्यात आली.
दिलेल्या निवेदनावर हरीष डावरे,एस्.के चेले,दगडु भोसले, रामभाऊ गायकवाड,धिरज बेळंबकर,बाबासाहेब गायकवाड, संजय कांबळे अदिंच्या स्वाक्षऱ्या करण्यात आली आहे.








