Best News Portal Development Company In India

हंगामासाठी शेतकऱ्यांना  आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रस्ता रोको आंदोलन!

हंगामासाठी शेतकऱ्यांना  आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रस्ता रोको आंदोलन!
तुळजापूर प्रतिनिधी :- अर्धा तास तीर्थक्षेत्र तुळजापुरातील वाहतूक ठप्प झाली होती. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी केलेल आंदोलन यशस्वी. शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती.
खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणी साठी बुधवार दिनांक 10 रोजी जुन्या बस स्थानक समोरील चौकात  स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्रच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. तसेच काँग्रेस रिपाई सह अनेक संघटना पक्ष आणि या आंदोलनात सहभाग नोंदवून पाठिंबा दिला  . याबाबत तहसीलदार तुळजापूर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात खत व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणे, बनावट बियाणे व खतांवर नियंत्रण ठेवणे, पीक कर्ज वितरण सुलभ करणे, सिंचनासाठी नियमित वीजपुरवठा करणे तसेच कृषी विभागामार्फत तांत्रिक मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संघटनेने शेतकऱ्यांना पीक कर्जाचे ०% व्याजदराने वितरण करण्याची मागणीही केली आहे. तसेच हमीभाव केंद्रे वेळेत सुरू करून खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यावर भर देण्यात यावा या मागणीची दखल न घेतल्यास आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी दिला .
खत व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध करावा.
पीक कर्ज वितरण प्रक्रिया सुलभ करावी.
सिंचनासाठी नियमित वीजपुरवठा द्यावा.
कृषी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत.
हमीभाव केंद्रे वेळेत सुरू करावीत.
“शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अन्यथा कडक आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.” असा इशारा यावेळी  रविंद्र इंगळे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना. यांनी दिला या आंदोलनात
काँग्रेसचे पक्ष नेते अमोल कुतवळ नगरसेवक रणजित इंगळे नगरसेवक आनंद जगताप श्रीकांत धुमाळ कल्याण भोसले  धनाजी पेंदे रिपाईचे  तानाजी कदम संजय .शितोळे प्रकाश कदम अरुण कदम दाजी माने रवि वाघमारे विकास हावळे ,      चंद्रकात नरोळे राजेंद हाके शहाजी सोमवंशी विकास तांबे दुवास  भोजणे संतोष  भोजणे विकास भोजणे भुजंग भोजणे हरिदास भोजणे अदि स्वाभीमान शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी सह इतर शेतकरी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल होते .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india