Best News Portal Development Company In India

कोणताही व्यक्ती समाजापेक्षा मोठा नाही: प्रमाणित लेखापरीक्षक चंद्रकांत शिंदे यांचे मत !

कोणताही व्यक्ती समाजापेक्षा मोठा नाही: प्रमाणित लेखापरीक्षक चंद्रकांत शिंदे यांचे मत
————————————————
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
कोणताही व्यक्ती कार्यकर्तृत्वाने किंवा पदाने कितीही मोठा झाला तरी तो समाजापेक्षा मोठा नाही शेवटी व्यक्ती पेक्षा समाज मोठा आहे तेंव्हा सामाजिक जाणीव ठेवून आपण खारीचा वाटा म्हणून समाजकार्यात प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सक्रिय राहिले पाहिजे या जाणिवेतूनच आपण सामाजिक कार्यात सक्रिय आहोत असे प्रामाणिक मत प्रमाणित लेखापरीक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते भिमशाहीर चंद्रकांत खंडू शिंदे यांनी सिंदगाव ता. तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
दि.१० जून रोजी सिंदगाव ता.तुळजापूर येथील बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकर,
चळवळीतील एक अभ्यासू आणि निष्ठावंत कार्यकर्ते,आपल्या मधुर वाणीतून बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणारे भिमशाहीर हार्मोनियम वादक तथा गायक व प्रमाणित लेखापरीक्षक चंद्रकांत शिंदे यांच्य ६३ का वाढदिवसा निमित्ताने सिंदगाव येथे अभिष्टचिंतनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना चंद्रकांत शिंदे बोलत होते.
. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे नेते आर.एस.गायकवाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे माजी तुळजापूर तालुका अध्यक्ष तथा माजी सैनिक अंकुश लोखंडे हे होते.
प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून सामुदायिक रित्या बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्षिय स्थानावरून बोलताना आर.एस.गायकवाड म्हणाले की चंद्रकांत शिंदे हे सामाजिक जाणीव चे कार्यकर्ते असून आपला घर प्रपंच सांभाळत ते आपल्या मधुर वाणीतून भीम गीत गायनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा फार मोठं सामाजिक कार्य करतात आपल्या प्रेमळ आणि नम्र स्वभावामुळे चळवळीतील सर्व कार्यकर्त्यात,नातेवाईकात त्यांनी एक माणूसकीचा जिव्हाळा निर्माण केला आहे.तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अंकुश लोखंडे म्हणाले की महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व म्हणजे चंद्रकांत शिंदे होय.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रिपाइं(आठवले) चे धाराशिव जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के.गायकवाड यांनी केले याप्रसंगी मतोश्री शांताबाई शिंदे,वंदना तात्याराव वाघमारे, कलाप्पा गायकवाड,दत्ता कांबळे, बालाजी गायकवाड, प्रशांत शिंदे,बालाजी शिंदे, संतराम गायकवा, अण्णासाहेब वाघमारे सह शालेय विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india