एसीत बसून कारभार करणाऱ्या सरकारला पालातील वेदना कधी समजतील..? ॲड.डॉ.अरूण (आबा) जाधव यांचा सरकारला खडा सवाल
—————————————————-
नळदुर्ग (एस.के.गायकवाड): दि.५ जून रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील खर्डा या ठिकाणाहून सुरू झालेली मुशाफिरी यात्रा पुणे,सोलापूर जिल्हा करून दि. १२ जून रोजी धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या नळदुर्ग ता.तुळजापूर येथील कलाशंकर नगर या वस्तीत पाल मारुण राहत असलेले महादेव कोळी,मरीआई वाले व इतर भटके विमुक्त समाजाचे लोक राहत असलेल्या वस्तीत आली असता तेथील लोकांची दैनिय आवस्था पाहून या यात्रेचे प्रमुख मार्गदर्शक भटके विमुक्तांचे राज्य समन्वयक ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव यानी एसीत बसून राज्य कारभार करणाऱ्या सरकारला इथल्या भटक्या विमुक्तांच्या व्यथा आणि वेदना कशा समजणार असा खडा सवाल उपस्थित करून भटक्या विमुक्तांच्या विकासा करिता त्यांचा कुटूंबाची घर गणना व जनगणना झाली पाहीजे असी मागणी केली.
या नंतर जळकोट ता. तुळजापूर या ठिकाणी नाथपंथी डवरी गोसावीच्या पालावर ही मुशाफिरी यात्रा पोहोचली.या ठिकाणी नाथपंथी समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.सभेच्या प्रास्ताविकात मुशाफिरी यात्रेचे राज्य समन्वयक प्रा.संतोष चव्हाण यांनी घर गणना व जन गणना करणे भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.असे मत त्यांनी मांडले.
तर या यात्रेचे प्रमुख मार्गदर्शक अँड.अरुण जाधव सभेला मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या समाजाने भटकंती करीत किती दिवस जीवन जगायचे.आपल्या येणाऱ्या पिढीचे भवितव्य घर गणना व जन गणनेच्या नोंदीवर अवलंबून आहे.संविधानाने माणूस म्हणून जगण्यासाठी आपल्याला दिलेले हक्क व अधिकार हे संघर्ष करून मिळवले पाहिजेत.
भटके विमुक्त समाजाच्या प्रश्नांकडे सरकारने लक्ष द्यावे असे आवहान ही शेवटी त्यांनी केले.
. या दोन्ही सभेचे आयोजन युवा कार्यकर्ते गोविंद भंडारे यांनी केले.या सभेला ऋषीभाऊ गायकवाड,जाकीर भाई तांबोळी,तुकाराम शिंदे,कैलास गवळी,परमेश्वर लोखंडे,आशिष लोंढे,बाबासाहेब बनसोडे,दुर्वांश बनसोडे,सतिश खारवे,पत्रकार एस.के.गायकवाड,मोहन चौगुले, बालाजी लाखे,साहेबराव शिंदे,गोरख सावंत,भिमराव सावंत,रंजना सावंत,आशा शिंदे,जनाबाई सावंत,बजरंग, ज्ञानेश्वर कांबळे,लक्ष्मण कोळी,राम कोळी,चिनाप्पा कोळी, शांताबाई कोळी,मालन कोळी, गंगूबाई कोळी आदि समाज बांधव उपस्थित होते.






