चिंचोली( जहागीर) येथिल 22 युवकांनी पाऊस पडण्यासाठि तुरोरी येथील हनुमान मंदीरातील मारुतीच्या मुर्तीला पाणी घालुन केली प्रार्थना .
तुरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.
तुरोरी दि.20 मृग नक्षत्र निघून बारा दिवस उलटून गेले तरी अद्यापही पावसाने ओढ दिल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे, त्यामुळे उमरगा तालुक्यातील चिंचोली (जहागीर) येथील 22 युवक परिसरातील अकरा गावातील हनुमान मंदीरातील मारुतीच्या मुर्तीला पाणी घालण्यासाठी पुढाकार घेतले आहेत. तुरोरीच्या हनुमान मंदीरात शनिवारी (दि.20) या युवकांनी पाणी घालून महाआरती करून पाऊस पडण्यासाठी प्रार्थना केली.
धाराशिव जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ अर्चना युवराज दाजी जाधव व तुरोरी ग्रामपंचायत सदस्य विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महेश पाटील यांच्या पुढाकाराने चिंचोली येथील शेतकरी कुटुंबातील हनुमान युवक मंडळाच्या युवकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या सहा वर्षांपासून पावसाने वेळेवर हजेरी लावली होती व पेरण्याही वेळेवर झाल्या होत्या पण यंदा मात्र अलनिनोचे संकट गडद झाल्याने पावसाने ओढ दिली आहे.शेतीची मशागत करून शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. उनाचा कडाका वाढला आहे. विहीर व बोअरवेल कोरडे पडत आहेत, त्यामुळे या युवकांनी हनुमाला पाणी घालून पाऊस पडावे म्हणून साकडे घातले आहेत. यानंतर जिल्हा परिषद सदस्या सौ जाधव यांच्या वतीने सर्व युवकांनसाठी अल्पोपहारची सोय केली होती.
या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य एस. वाय. जाधव, जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य तथा तुरोरी व्यापारी बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक तात्या जाधव कारभारी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पवन जाधव, माजी उपसरपंच पंडित शिंदे, पत्रकार बालाजी माणिकवार, कवी काशिनाथ बिराजदार,अतुल पवार,सुरज उर्फ बंटी जाधव, अभिजित जाधव, आदिनाथ माने, चैतन्य जाधव,अमीर मुरमे, संजय पाटील, अशोक बिराजदार, ज्ञानेश्वर पाटील, प्रमोद कुलकर्णी,केरनाथ जाधव आदींची उपस्थिती होती .







