पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल हा केवळ एका कुटुंबाशी संबंधित विषय नसून न्यायव्यवस्थेवरील जनतेच्या विश्वासाशी निगडित प्रश्न आहे.
उमरगा लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
वीस वर्षे न्यायासाठी संघर्ष करूनही या प्रकरणात अपेक्षित न्याय मिळाला नाही, ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर राखत, पुढील कायदेशीर टप्प्यांमध्ये सत्य समोर येईल आणि न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.
ओमराजे निंबाळकर यांचा राजकीय निर्णय, पक्षांतर किंवा इतर राजकीय घडामोडी हा वेगळा विषय आहे. त्या निर्णयाशी सहमत-असहमत असण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, एका मुलाने आपल्या वडिलांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळावा ही अपेक्षा ठेवणे आणि त्यासाठी लढा देणे, हे पूर्णपणे मानवी आणि न्याय्य आहे.
या प्रकरणात अंतिमतः न्याय मिळून सर्वसामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, हीच आमची प्रामाणिक भावना आहे.
© ऍड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)






