Best News Portal Development Company In India

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला उमरगा शिवसेनेचा बिनशर्त पाठिंबा.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला उमरगा शिवसेनेचा बिनशर्त पाठिंबा.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
पक्षांतराच्या चर्चांना उधाण आलेल्या पार्श्वभूमीवर उमरगा तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. तसेच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कोणताही निर्णय घेताना शिवसैनिकांच्या भावना व जनतेचा विश्वास लक्षात घेऊन विचारपूर्वक निर्णय घ्यावा, अशी भावनिक साद यावेळी उमरगा शिवसेनेच्या वतीने घालण्यात आली.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शिवसेना हा केवळ पक्ष नसून तो विचार, निष्ठा आणि स्वाभिमानाची चळवळ असल्याचे सांगितले. ठाकरे कुटुंबाच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी अनेक संकटांचा सामना केला असून आजही उमरगा तालुक्यातील शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाशी ठामपणे बांधील असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी शिवसेना नेते बसवराज वरणाळे, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार नागणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रणधीर पवार, उपतालुका प्रमुख सुधाकर पाटील, उपतालुका प्रमुख सिधाराम हत्तरगे, विभागप्रमुख आप्पाराव गायकवाड, मारुती थोरे, आणाराव माने, किरण कुकर्डे, तानाजी जाधव, मारुती बोदरे, संतोष जाधव, सागर उमाशेटे यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी “उद्धव साहेब पुढे चला, आम्ही तुमच्या सोबत आहोत” अशा घोषणा देत पक्षनिष्ठा व्यक्त केली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india