Best News Portal Development Company In India

मुरूममध्ये १२ वा राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न… ​विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव; समाजसेवेच्या कार्याला मिळाली नवी ऊर्जा…

मुरूममध्ये १२ वा राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न…
​विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव; समाजसेवेच्या कार्याला मिळाली नवी ऊर्जा…

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
​ दि.. २८ क्रांतीसूर्य, समतानायक जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती उत्सवानिमित्त बसव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १२ वा राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि. २८) रोजी रत्नमाला मंगल कार्यालयात अत्यंत थाटामाटात आणि उत्साही वातावरणात पार पडला. समाजकार्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला.
​मान्यवरांची उपस्थिती आणि दीपप्रज्वलन
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील होते. यावेळी औसाचे उद्योजक श्रुनक उटगे, नळदुर्गचे नगराध्यक्ष बसवराज धरणे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश अर्दाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश मंगरुळे, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, रशिद शेख, रोटरीचे माजी अध्यक्ष गोविंद पाटील, दत्ता बिराजदार, नगरसेवक राजेंद्र बेंडकाळे, रूपचंद गायकवाड, गणेश अंबर, अहमद मिनियार आणि सुनील ख्याडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या सोहळ्यात बापूराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील सत्कारमूर्तींना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, फेटा आणि पुष्पहार देऊन गौरविण्यात आले. ​राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार राजेंद्र पाचंगे, प्रकाश कांबळे, वीरभूषण लिमये तर राज्यस्तरीय पुरस्कार पंकज शहाणे, आशा कांबळे, दीपक शिंदे, डॉ. बालाजी बिराजदार, विठ्ठल चारे, रतन कटके, इरफान मुजावर, उल्हास घुरघुरे, राहुल मुळे, भारत सातपुते, मुस्तान मिर्झा, तानाजी भालेराव, कुमारी लव्या वाघमारे, विक्रम दासमे आणि तुळजाभवानी संघर्ष समितीचे सर्व सदस्य. ​यावेळी तीन शाळेतील ४०० गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे प्रतिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती कविवर्य भारत सातपुते, डॉ. बालाजी बिराजदार, आशाताई कांबळे यांनी आपल्या मनोगतातून कृतज्ञता व्यक्त करताना पुरस्कारांमुळे मिळते सामाजिक कामाची ऊर्जा, या पुरस्कारांमुळे भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून तो आमच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्याची पावती आहे, असे त्यांनी सांगितले. ​नळदुर्गचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी, बसव प्रतिष्ठानचा हा उपक्रम समाजाला योग्य दिशा देणारा असून, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी तो प्रोत्साहनाचा असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बसव प्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी या सोहळ्यामागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे तर आभार अजिंक्य मुरूमकर यांनी मानले. या सोहळ्यासाठी मुरूम शहर व परिसरातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india