Best News Portal Development Company In India

तिर्थक्षेत्र अचलबेट देवस्थान येथे गुरु पोर्णिमेनिमित्त धाराशिव, लातूर, बीड,विधानपरिषदेचे आमदार बसवराज पाटिल यांनी घेतले दर्शन.

तिर्थक्षेत्र अचलबेट देवस्थान येथे गुरु पोर्णिमेनिमित्त धाराशिव, लातूर, बीड,विधानपरिषदेचे आमदार बसवराज पाटिल यांनी घेतले दर्शन.
तुरोरी दमयंती भालेराव.
दि.२९ रोजी गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर अचलबेट येथील गुरुवर्य परमपुज्य उज्वलानंदजी महाराज यांच्या संजीवन समाधीचे अत्यंत पवित्र वातावरणात विधानपरिषदेचे आमदार बसवराज पाटील यांनी दर्शन घेतले.

याप्रसंगी तेथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात सहभागी होऊन श्रीविठ्ठलाच्या नामाचा गजर अनुभवला. ह.भ.प. श्री. अनिल महाराज बार्शीकर यांच्या सुरेल आणि प्रबोधनात्मक कीर्तनाचा आनंद घेतला. कीर्तनानंतर महाराजांनी आमदार बसवराज पाटिल यांचा यथोचित सत्कार करुन सन्मानित करण्यात आले.
केलेल्या सत्काराबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल आ.पाटिल यांनी मनापासून आभारी व्यक्त केले.
या अध्यात्मिक सोहळ्यास माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, बाजारसमितीचे सभापती बसवराज कस्तुरे, ह.भ.प.हरी गुरुवारी लवटे महाराज,शाहूराज भोसले, महेश आष्टे, कुमार पवार ,प्रदीप जाधव, दयानंद सुर्यवंशी ,सुभाष जाधव ,पंडित मुळे, पंचायत समितीचे सदस्य दगडू मोरे, यांच्यासह अनेक मान्यवर, वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india