Best News Portal Development Company In India

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन; मंदिर संस्थानतर्फे जंगी स्वागत!

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन; मंदिर संस्थानतर्फे जंगी स्वागत!
​तुळजापूर प्रतिनिधी :- महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी नतमस्तक होत विधिवत पूजा-अर्चा केली. राज्यपाल पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी देवीचे दर्शन घेऊन परंपरेनुसार कुलधर्म व कुलाचार पूर्ण केले. यावेळी त्यांनी श्री तुळजाभवानी देवीची ओटी भरून भावपूर्ण वातावरणात आरती केली.
​राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान परिसर येथे आगमन होताच प्रशासनाच्या वतीने त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार आणि अपर जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांचे स्वागत केले.
​या सोहळ्याप्रसंगी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, खाजगी सचिव पवन सिंग, पोलीस अधीक्षक रितू खोकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्यासह मंदिर संस्थानचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
​राज्यपालांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दर्शन सोहळ्यानंतर उपस्थितांनी राज्यपालांचे आभार मानले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india