द्रोपतीबाई साखरे यांचे दुःखद निधन
___________________________________
नळदुर्ग (प्रतिनिधी ):
उमरगा (चिवरी) ता. तुळजापूर येथील आंबेडकरी चळवळीतील बुद्धीजीवी कार्यकर्ते सिद्राम यशवंत साखरे यांच्या मातोश्री द्रोपतीबाई यशवंत साखरे राहणार उमरगा( चिवरी) तालुका तुळजापूर हल्ली मुक्काम साखर कारखाना नळदुर्ग यांचे दि. १२ मार्च २०२६ रोजी पहाटे ठिक ४.३० वा.दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या पार्थिव देहावार त्याच दिवसी सायंकाळी ठीक ५.३o वाजता तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना नळदुर्ग येथे बौद्ध धम्म संस्कारानुसार अंतिम संस्कार करण्यात आले.
कालकथित मातोश्री द्रोपतीबाई साखरे या उमरगा (चिवरी) तालुका तुळजापूर येथील मूळ रहिवासी असून त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्पन्नाचे कसलेही साधन नसताना केवळ मोलमजुरी करून कष्ट करून आपले पती यशवंत साखरे यांच्या सोबत संसार थाटला.चार मुलं आणि एक मुलगी अशा पाच अपत्यांना त्यांनी उच्च शिक्षित केलं.अत्यंत प्रेमळ आणि कष्टाळू व्यक्तिमत्त्व असलेल्या द्रोपतीबाई यशवंत साखरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव सिद्राम साखरे यांनी आपल्या परिस्थितीशी झगडत आई-वडिलांच कष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रसंगी आई-वडिलांच्या आर्थिक उत्पन्नात मदत करावी आपल्या शिक्षणाला मदत होईल म्हणून त्यानी सुद्धा मिळेल ते काम करत करत प्राथमिक शिक्षक म्हणून महाराष्ट्र शासनामध्ये नोकरी मिळवली आणि आज ते देशाची भावी पिढी घडवण्याचं काम अगदी प्रामाणिकपणे करतात.आईने घालून दिलेला कामावर निष्ठा हा वसा पुढे नेत आपल्या कामावर निष्ठा ठेवून ते आज जिल्हा परिषद धाराशिव च्या प्राथमिक शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षक म्हणून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.दुसरे चिरंजीव प्राध्यापक डॉ दत्ता साखरे यांनी सुद्धा आपल्या आई-वडिलांच्या कष्ट समोर ठेवून प्रसंगी वाटेल ते काम करून कष्ट करून अगदी अलीकडच्या काळात खवा विक्रीचा छोटासा व्यवसाय करत करत ते एम.ए.पी.एच.डी. झाले सेट नेट सारख्या परीक्षा उत्तीर्ण होऊन आज श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव या ठिकाणी वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. दुसरे दोन्हीही चिरंजीव संतोष साखरे व लिंबराज साखरे हेही शिक्षण पूर्ण करून आपल्या स्वतंत्र व्यवसायामध्ये आहेत तर मुलगी सोना ही एक आदर्श गृहिणी म्हणून आपल्या पती समवेत संसारात व्यस्त आहे.अशा प्रकारे एक संसारक्षम कुटुंब घडविण्यात मातोश्री द्रौपदी बाई साखरे यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे.कमवा आणि शिका हा आदर्श या साखरे कुटुंबाकडून घेण्यासारखा आहे. या मध्ये कुटुंबाचा एक मोठा आधार म्हणजे आई कै.द्रोपतीबाई साखरे ह्या होत्या.त्यांच्या निधनाने मातृत्वाचा आधार तुटला आहे.
. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल श्रद्धांजली व्यक्त करताना एवढेच म्हणावे लागेल की एक आईच्या मायचं प्रेमळ आणि कष्ठाळू व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड झालं असून साखरे कुटूंबावर असलेल मातृत्वाचं छत्र त्यांच्या निधनाने हरवले आहे.
. मृत्यू समई त्यांचे वय ६५ वर्षे होते.त्यांच्या पश्चात पती, चार मुलं,एक मुलगी, सुना,जावई, नातवंडे,असा मोठा परिवार आहे






