Best News Portal Development Company In India

पालात राहणाऱ्या भटक्या विमुक्त जाती समाजातील कुटुंबाची गणना देशाच्या घर गणना व जातनिहाय जनगणना प्रक्रियेत स्वतंत्र रखान्यात नोंद करावी या मागणीकरिता मुशाफिरी यात्रेचे आयोजन : नगरसेवक अँड.अरुण जाधव यांची माहिती!

पालात राहणाऱ्या भटक्या विमुक्त जाती समाजातील कुटुंबाची गणना देशाच्या घर गणना व जातनिहाय जनगणना प्रक्रियेत स्वतंत्र रखान्यात नोंद करावी या मागणीकरिता मुशाफिरी यात्रेचे आयोजन : नगरसेवक अँड.अरुण जाधव यांची माहिती
——————————————————-
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
महाराष्ट्रातील मरगरम्मा कोळी, डवरी गोसावी,पारधी,कैकाडी, सह पालात राहणाऱ्या एकून ४२ भटक्या विमुक्त जाती जमातीतील कुटुंबाची गणना देशाच्या घरगणना व जातनिहाय जनगणना प्रक्रियेत स्वतंत्र रखान्यात करण्यात यावी या मागणीसाठी भटक्या विमुक्त समाजात जाणीव जागृती करण्यासाठी मुशाफिरी यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या यात्रेचे प्रमुख मार्गदर्शक तया वंचित बहुजन आघाडीचे नेते जामखेड नगर परिषदेचे नगर सेवक ऍड. डॉ.अरुण (आबा) जाधव यांनी नळदुर्ग ता. तुळजापूर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिली.
सध्या देशाच्या जनगणनेची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रात घरगणना चालू आहे या घरघरणेमध्ये ही महाराष्ट्रात गावोगावी ठीक ठिकाणी पाल मारून राहणाऱ्या भटक्या विमुक्त जाती जमातीतील कुटुंबाच्या पालाची ही गणना घरगणनेमध्ये स्वतंत्र रखान्यात करून सन २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये ही या भटक्या मुक्त जाती-जमातीतील कुटुंबाची नोंद जनगणनेच्या प्रक्रियेत स्वतंत्र रखान्यांमध्ये करावी या मागणीसाठी जाणीव जागृती करण्याकरिता दि.०५ ते १४ जून २०२६ पर्यंत महाराष्ट्रातील आहिल्यानगर,पुणे, सोलापूर, धाराशिव,लातूर, बीड व जालना आदी ७ जिल्ह्यात या मुशाफिरी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.हि यात्रा एकून ११० पाला-वस्त्यांवर पोहचंणार असून दि.५जून पासून आहील्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथून या मुशाफिरी यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.
दि.१२ जून २०२६ रोजी ही यात्रा तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग या ठिकाणी आली असता वंचित बहुजन आघाडी सह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी येथील राष्ट्रीय महामार्गावर बसस्थानका समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात या यात्रेचे उस्पूर्तपणे स्वागत केले याप्रसंगी डॉ.अरुण जाधव हे कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की भटक्या विमुक्तांची घर गणना नाही तर मग जातनिहाय जनगणना कशी होणार आणि जनगणनाच नाही तर मग भटक्या विमुक्त समाजाचा विकास कसा साधला जाणार यासाठी प्रामुख्याने लक्ष वेधण्यासाठी या मुशाफिरी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.भारतीय संविधानानुसार देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्यांचे मानवी हक्क मिळाले पाहिजे.भटक्या विमुक्त समाजातील कुटुंबाचा विकास करण्यासाठी स्वतंत्र विशेष विकास योजना राबविल्या पाहिजेत ही सत्ताधारी सरकारची जबाबदारी आहे याची जाणीव करून देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या मुसाफिर यात्रेचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.
या प्रसंगी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते कैलास गवळी गुरुजी,आर.एस. गायकवाड, भिम शक्ती संघटनेचे नेते डॉ.सतीश खारवे,रिपाइं चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा सचिव एस.के. गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे तुळजापूर तालुका अध्यक्ष गोविंद भंडारे,जिल्हा संघटक परमेश्वर लोखंडे, युवा जिल्हा उपाध्यक्ष अशिष लोंढे, मुशाफिरी यात्रेचे समन्वयक प्रा. संतोष चव्हाण, या यात्रेचे प्रतिनिधी तुकाराम शिंदे, ऋषीकेश गायकवाड जाकीर भाई तांबोळी सह परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होत.
.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india

पालात राहणाऱ्या भटक्या विमुक्त जाती समाजातील कुटुंबाची गणना देशाच्या घर गणना व जातनिहाय जनगणना प्रक्रियेत स्वतंत्र रखान्यात नोंद करावी या मागणीकरिता मुशाफिरी यात्रेचे आयोजन : नगरसेवक अँड.अरुण जाधव यांची माहिती!