Best News Portal Development Company In India

भूमिहीन शेतमजुरांना घरकुलासाठी जागेचा मालकी हक्क ( कबाला ) द्या; ऑल इंडिया फकिरा ब्रिगेड चे उपविभागीय अधिकारी उमरगा यांना निवेदन!

भूमिहीन शेतमजुरांना घरकुलासाठी जागेचा मालकी हक्क   ( कबाला ) द्या; ऑल इंडिया फकिरा ब्रिगेड चे उपविभागीय अधिकारी उमरगा यांना निवेदन.

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
( दि. १६). रोजी लोहारा तालुक्यातील मौजे दस्तापूर येथील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना त्यांच्या वास्तव्यास असलेल्या जागेचा मालकी हक्क (कबाला) देण्यात यावा, या मागणीसाठी ऑल इंडिया फकीरा ब्रिगेडच्या वतीने मा . उपविभागीय अधिकारी उमरगा यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, मौजे दस्तापूर येथील गट क्रमांक ९८ मधील २५ आर जमीन शासनाने सन १९६५ मध्ये भूमिहीन शेतमजुरांसाठी राखीव ठेवली होती. या जागेवर अनेक वर्षांपासून भूमिहीन शेतमजूर वास्तव्यास असून त्यांनी घरे बांधून आपले जीवन उभे केले आहे. मात्र, आजतागायत संबंधित रहिवाशांना त्यांच्या वास्तव्याच्या जागेचा मालकी हक्क देण्यात आलेला नाही.
यामुळे नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यात तसेच इतर प्रशासकीय कामकाजात अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

भूमिहीन शेतमजूर वसाहतीचे सर्वेक्षण करून नियमानुसार रहिवाशांना मालकी हक्क प्रमाणपत्र (कबाला) देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी संबंधित विभागा कडे करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन उपविभागीय अधिकारी उमरगा यांच्याकडे सादर करण्यात आले.
ऑल इंडिया फकीरा ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे संस्थापक श्रीरंग केरनाथ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी नागिण थोरात, अलका लोंढे, पार्वती झुंजारे, छबुबाई देडे, भारताबाई लोंढे, शिवाबाई झुंजारे प्रेमनाथ काळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india