मृग नक्षत्राच्या हुलकावणीने शेतकरी राजाचे डोळे आभाळाकडे : खरिपाच्या पेरण्या कोळंबल्या
—————————————————-
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
एप्रिल मे मधील 2026 च्या कङक उन्हाच्या तडाख्याने कासावीस झालेली जनता आणि शेतकरी मृग नक्षत्राची डोळ्यात तेल घालून वाट पाहत होते. शेवटी दि. 8 जूनला मृग नक्षत्राची सुरुवात ही कोरडीच झाली.त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या व जनतेच्या अशा नी अपेक्षा भंग झाल्या.आज तरी पाऊस पडेल,मृग नक्षत्र हजरी लावेल या अपेक्षेने शेतकरी राजाचे डोळे दिवसेंदिवस आभाळाकडे लागलेले आहेत. पण मृग नक्षत्रातील गेले आठ दिवस कोरडेच गेल्याने खरीप हंगामातील पिकांची पेरणी वेळेत होते की नाही ही चिंताआता शेतकऱ्यांमध्ये वाढत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सुद्धा “पड रे पाण्या पडरे पाण्या” हे गीत दररोज वायरल होत असताना दिसत आहे.
एकंदरीत पावसाची वाट सगळेच पाहत असताना
दिसत आहेत.गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी अवकाळी पाऊस अर्थात रोहिणी नक्षत्र नक्षत्रातील पाऊस कमी प्रमाणात झाला. त्यात मृग नक्षत्र अद्याप कोरडेच जात आहे त्यामुळे खरीप हंगामातील पिकाची पेरणी करण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना महागडे बी बियाणे खरेदी करून पावसाची वाट पहात बसण्याची वेळ आली आहे.
तर सर्वसामान्य शेतकरी महागडी बी बियाणे खत फवारणीचे औषध खरेदी करायचे की नाही अशा द्विधा मनस्थितीत आहेत. गतवर्षी खरीप हंगामातील पेरण्या वेळेत झाल्या होत्या. तर सरत्या पावसाने रौद्ररूप धारण केल्याने रब्बी हंगामातील पेरणी पुढे गेली होती. त्यामुळे ज्वारीच्या पिकावर विपरीत परिणाम झाला होता.तर खरीप हंगामातील पिकाचे काढणी अभावी नुकसान झाले होते. वरून राजाच्या अशा लहरीपणामुळे अनेक प्रश्न जनतेसमोर निर्माण झाले आहेत.
मोठ्या शहरांना पिण्याचे पाणीपुरवठा करणारी धरणातील, तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसत आहे.त्यामुळे अनेक शहरावर पाणी कपातीची वेळ येऊन ठेपली आहे.तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर नळदुर्ग व अंणदूर या मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणारे नळदुर्ग येथील एकमेव बोरीधरण आहे. या धरणाचेही पाणी आता मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यात नळदुर्ग येथील उच्चस्तरीय बंधारा देखील कोरडा होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभे असलेले उसाचे पीक कसे जगवावे व खरीप हंगामातील पिकासाठी मशागत करून ठेवलेल्या काळ्या आईची ओटी कसी भरयची असे अनेक प्रश्न पडलेले आहेत.श
खरीप हंगामातील प्रामुख्याने घेतली जाणारे पिके म्हणजे सोयाबीन मूग उडीद तुर बाजरी वगैरे पिकांची पेरणी वेळेत नाही झाली शेतीउत्पन्नात घट होऊन शेतकरी आर्थिक आडचणीत येवू शकतो.या चिंतेत शेतकरी असतानाच शेतकऱ्याची पगार श्रावण बाळ,संजय गांधी,इंदिरा गांधी,लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांना मिळणारे मानधन
डीबीट, kycवगेरे कारण पुढे करून गेल्या सहा महिन्यापासून सरकारने दिले नाही.पाऊस न आल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील कामे थांबली आहेत त्यामुळे भूमिहीन शेतमजुरांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. तसेच पाण्याअभावी बांधकामे खोळंबलेली आहेत त्यामुळे बांधकाम कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. भूमिहीन शेतमजूर बांधकाम कामगार यांच्या मुला मुलींचे शैक्षणिक प्रवेश आर्थिक अडचणीमुळे कसे घेणार, त्यांचे शैक्षणिक कसे पूर्ण करायचे या चिंतेत गोर गरीब कुटुंबातील पालक आहेत.जर वेळेत पाऊस नाही आला तर सत्ताधारी सरकारला गोरगरीब जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी व किमान पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे यात शंका नाही.तेव्हा शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या बांधकामकारांच्या आर्थिक अडचणीचा विचार करून सरकारने लाभार्थी श्रावण बाळ संजय गांधी इंदिरा गांधी योजनेतील लाभार्थ्यांचे मानधन जाचक अटी कमी करून त्वरित वाटप करावे. अनेक पात्र लाभार्थी रेशन कार्डधारकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळत नाही. तुळजापूर तालुक्यातील अनेक रेशन कार्डधारकांनी अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करून आमच्या कुटुंबाला अन्नधान्य पुरवठा सुरू करावा यासाठी रीतसर अर्ज केलेले आहेत परंतु गेल्या एक वर्षापासून ते अर्ज संबंधित पुरवठा विभागात धूळ खात पडलेले आहेत याबाबत विचारले असता सरकारकडे धान्य पुरवठा कमी आहे. असे बेजबाबदार उत्तर दिले जाते त्यामुळे अशा लाभार्थी कुटुंबांना महागाईच्या आणि पाणीटंचाईच्या काळात सरकारने लक्ष द्यावे अशीही मागणी जोर धरत आहे.





