ग्रामगीताकार
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
गरीबी-श्रीमंती
उमरगा लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेकर.
धन हे गरीबांचे रक्त | समजोनि
वागोत श्रीमंत |
श्रम हि गावाची दौलत |म्हणोनि
म्हणोनि व्हावा मान तिचा ||५४||
ऐसे केलिया सकळ जनांनी |
वर्गभेद मिटतील गावचे दोन्ही |
यास बुध्दी द्यावया उपजोनि |
साधु,संतांनी काम घ्यावे ||५५||
आणि सावध असावे सरकार |
नीटनेटका घडवाया व्यवहार |
जनतेमाजी भराभर |
वारे शिजवावे शिक्षणाचे ||५६||
लहान मुली-मुलांपासोनि |
मिटवावी गरीब-श्रीमंती श्रेणी |
सर्वांस पाहाया समानपणी |
लावावे प्रत्यक्ष कृतीने ||५७||
शब्दात नको समसमान |
प्रत्यक्ष पाहिजे धन,मान,शिक्षण|
फूट पाडितो ते द्यावेत हाकोन |
गावचे भेदी ||५८||
नसतील ऐकत जे जे कोणी |
त्यांना कायद्याने घ्यावे आटपोनि
मग रचना करावी समानगुणी |
इमान जागी ठेवोनिया ||५९||
जैसे बापास पुत्र सारिखे |
तैसे गरीब,श्रीमंत राजाचे सखे |
हा भेद मिटविणे काम निके |
त्याचेचि असे राजधर्म ||६०||
पण जेथे सरकार मिंद्दा झाला?|
तेथे आग लागली प्रजेला |
मग कोण पुसे कोणाला ?|
धिंगाणा झाला पहा सर्व||६१||
संत,साधूहि मिंद्ये झाले |
दक्षणेवरीच मोहून गेले |
मग पर्वताचे कडेचि लोटले
समाजावरि ||६२||
जनतेला मग वालीच नाही |
ती चेतता मग आगचि सर्वहि |
भस्म होईल सगळी मही |
हाहा:कारे ||६३||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी २५ डिसेंबर १९५५ रोजी प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली त्यात गरीबी-श्रीमंती अध्यायात आजचे आणि त्यावेळीचे अपेक्षित विचार जे आहेत ते वास्तव आहेत.संताचे शब्द अनुभव तथा अनुभूतीतुन प्रेरीत झालेले असतात.खरे संत व त्यांचे विचार कधीच संपत नाहीत.पृथ्वीवर जोवर चंद्र आणि सूर्य आहेत तोवर संतांचे विचार,त्यांची शिकवण जिवंत राहतील.हे विचारच सामाजिक स्थिरता,मानसिक परिपक्वता, सामाजिक सुरक्षितता निर्माण करू शकतात.हेच विचार क्रांती घडवू शकतात,परिवर्तन घडवू शकतात हेही तितकेच त्रिकालाबाधित सत्यही आहे.
जातीधर्माच्या पलिकडे विषमता,संघर्ष म्हणजे गरीबी-श्रीमंतीमधील दरी.जिथे
अवाजवी धन येते तिथे गरीबांचे रक्त असते हे रक्त पिण्याचा अधिकार आपलेच आहे असे श्रीमंत समजतात.श्रम हे घरची,गावाची,देशाची,जगाची दौलत आहे म्हणून तिला मान,स्थान असावे हे तुकडोजी सांगतात.श्रमा शिवाय जगाचे पान हलणार नाही हे लोक विसरतात. समाजातील,
गावातील मतभेद,अस्थिरता, अनैतिकता,अज्ञानी दुर करून शांती,प्रगती प्रस्थापित करण्याचे काम साधु,संतांनी घ्यावे व करावे हे अपेक्षित आहे.पण संत प्रबोधनापेक्षा जास्त रमत आहेत.जे संत जनतेला आई-वडिलांची सेवा करा म्हणणारे आपल्याच आईवडिलांना संभाळत नाहीत हे किती व्यंग आहे.ऐसे संत समाजाचे भले काय करतील आणि काय पात्रता अंगी असेल. राजकारणावरही नियंत्रण,
जबाबदारी,सावधगिरी ठेवणे सरकारवर असते ते त्यांनी पार पडावी.पण आज राजकारणच भ्रष्ट आहे स्वतःच गुन्हेगार आहे,घोटाळेबाज आहे मग ते समाजात काय प्रबोधन करणार यासाठी समाजात जागृती होण्यासाठी शिक्षणाचे फार महत्व जनतेनेच जाणले पाहिजे व शिक्षीत होणे काळाची गरज आहे.शिक्षण हा आपला आत्मा आहे हे जाणले पाहिजे.याचे जनजागरण करून शिकण्यासाठी प्रेरीत करावे.
समाजात निटनेटका व्यवहार साधण्यासाठी हे गरजेचे आहे.हि अपेक्षा तुकडोजींनी व्यक्त केली आहे.दुर्देव आज सरकारच स्थिर
नाही,सरकारच प्रामाणिक नाही,सरकारच संविधानीक नाही,न्याय व्यवस्था,कायदे व्यवस्था वा कार्यकारी व्यवस्थाच भ्रष्टाचार आणि
घोटाळ्यात अडकली आहे.
कायदा आणि न्याय फक्त स्वतःसाठी,स्वतःच्या फायद्यासाठी तथा रक्षणासाठीच
राज्यकर्ते वापरत आहेत. ज्याची सत्तेची लाठी त्यांची म्हैस आज आहे.त्यापुढे हि व्यवस्था सत्तेची बटिक बनली आहे,विकली गेली आहे.सरकार हे जनतेचे मायबाप असते इथे तर वैरी बनली आहे.सर्वसामान्य जनतेला हक्काचा योग्य न्याय मिळत नाही, व्यक्ती स्वातंत्र्य मिळत नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळत नाही.आज नेमके या विरूध्द इथे तक्रारदारावर गुन्हा दाखल केला
जातोय,सत्य सांगणे किंवा कुणाची तक्रार करणे आज गुन्हा ठरतो आहे.हा राजधर्म राज्यकर्ते पाळण्यास तयार नाहीत कारण यांचा स्वार्थ आडवा येतोय.सरसमान श्रेणी,दर्जा देणे,लहानांपासून थोरांपर्यंत,सर्व जातीधर्मात समान व्यवहार करावा.हे केवळ आश्वासन,भाषणातुन नव्हे तर कृतीतुन सिध्द करावे.जसे बापाला सारी लेकरे आपलीच आणि सारखीच वाटतात आणि तशी वागणूक देतो तसेच सरकार हाही आमचा मायबाप होऊनच वागावे.धन,मान,
शिक्षण हे प्रत्यक्ष कृतीतुन परीणामातुन दिसले पाहिजे पाहिजे,तेव्हा समानता नांदेल.
पण आज सरकारच मराठी शाळा बंद करून खाजगी शाळांना मोठे करून शिक्षण महाग करण्याच्या प्रयत्नात आहे.इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे,सामान्यांनी शिकायचे नाही हा जो जुने मुठभर बुध्दीवादींचे षडयंत्र होते ते आज पुन्हा सुरु होत आहे.
तुकडोजी महारांजाचा विचार सर्वांनी शिक्षण घ्यावे शिक्षीत व्हावे हा विचार होता.आज तर उच्च शिक्षणाच्या स्पर्धा परिक्षेच्या पेपर सरकारच्या मदतीने फुटत आहेत,पेपर विकले जात आहेत,पैसा कमवला जात आहे अशा देशद्रोहींना सरकार पाठिसी घालत आहे.जीवाचे
रान करून,घरदार विकून शिकणारे मुले आज बर्बाद होत आहेत त्याला खाजगी व्यवस्था आणि सरकार त्यांचे जीवनच उद्ध्वस्त करीत आहे.
*पण जेथे सरकार मिंद्दा झाला?*
*तेथे आग लागली प्रजेला |*
*मग कोण पुसे कोणाला?|*
*धिंगाणा झाला पहा सर्व ||*
हि अवस्था आजची झाली आहे.
सरकार सत्तेसाठी,पैशासाठी धनदांडग्यांचे,गुंडांचे,गुन्हेगारांचे,अत्याचारींचे,व्यभिचारीचे मिंद्दे झाले आहे.सगळ्या व्यवस्था स्वतःच्या स्वार्थासाठी ताब्यात घेऊन त्यांना लाच्चर गुलाम बनवले आहे तर सामान्यांना
कोण न्याय देणार?
आज जनतेला महागाईची,
बेकारीची आग लावली आहे. जिकडे-तिकडे सत्तेसाठी धिंगाणा घालू आहे.सुड,खोट्या
कारवायाचा धडाका चालू आहे.
जो सरकारला प्रश्न विचारेल त्यालाअराजक,आतंकवादी,देशद्रोही ठरवलं जातं आहे आणि त्यांना त्यांनी पाळलेले,पोसलेले कुत्रे साथ देत आहेत. गुंडगिरीतुन,दहशतीतुन मोर्चा मोडीत काढण्यात येत आहे.
याचा शिकार शेतकरी झाला,
कितीतरी शेतकऱ्यांना ठार मारले गेले,इंग्रजापेक्षा बत्तर आज जनतेची आहे.
*संत,साधूहि मिंद्दे झाले |*
*दक्षणेवरीच मोहून गेले |*
*मग पर्वताचे कडेचि लोटले |*समाजावरि ||*
आज प्रतेक चॅनलवर अनेक साधू,संत,महंत,योगी हि सत्तेला विकले केले आहेत.पडद्या मागचा सत्ताधारींचा लोकांना देव,धर्म,मंदिर,मज्जीतमध्ये गुंतवून ठेवण्याचे,अंधश्रद्धा पसरवण्याचे कार्य सोपवले आहे.संताच्या व्यासपीठा
वरून राजकारणाची विधाने करून समाजात,जाती-धर्मात दंगली घडवण्याचा जाहिर प्रकटणातुन करीत आहेत.
विज्ञानयुगात मंत्र,जप,तपाने जीवन घडते हे विचार पसरवत आहेत.अमुक करा हे प्राप्त होईल,तमुक करा कॅन्सर बरा होईल,संतती होईल,नौकरी लागेल,बरकत येईल अशा वल्गना करून जीवनातील मुळ मुद्यापासून भरकटवण्याचा प्रचार केला जात आहे.काही चॅनल,काही मिडिया,काही वृतमान पत्रे त्यांनी ज्यांनी खरेदी केले आहे त्याच मालकाच्या,
मंत्र्यांच्या,पक्षाच्या मालकीचे असताना संतांनी या ज्ञानपीठावर बुध्दी दारिद्र्य ऐकता कामा नये.विरोधकावर टिकात्म,सत्तेतील गुंडांचे
कौतुकात्मक भाष्य तथा पाठिंबा देत आहेत.बऱ्याच अंशी हि लोके हिंदुत्व,सनातन या विषयावर जातीवादात्मक बुध्दी दारिद्र्य ओकतात.दक्षणा दिली कि जयजयकार सुरू होतात,ह्या राजकीय ताकदीवर हल्ली अवैध धंदे हे लोक करत आहेत.
जनता लाखोंच्या संख्येने घरदार सोडुन यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात.पण प्रत्यक्षात संसारात,समाजात,नात्यात,घरात याचा कुठेच अनुकूल परिणाम दिसून येत नाही.केवळ यांच्या ब्रॅन्डवर राजकीय प्रतिमा आणि या प्रतिमेतुन मतदार, जनमत तयार करण्याचा मार्ग झाला आहे.योगी मंत्री होतोय याचाच अर्थ आपण किती सुधरलो हे कळते.सनातनी प्रभुत्वासाठी आणि राजकीय प्रभुत्व वाढवण्यासाठी वापर केला होतोय.एकही राजकिय पक्ष महाराजाविना नाही,दोघांनाही एकमेकांची गरज वाढली आहे.जेव्हा राजकीय व्यासपीठावर संत,महाराज,महंत,आले व धार्मिक व्यासपिठावर राजकीय लोक आले कि समजावे जनतेच्या भविष्याचा तमाशा सुरू झाला.संत,महाराज,
महंतांचे काम जनजागरण, मार्गदर्शन करणे व जनतेला योग्य जीवनाचा मार्ग दाखवणे हे आहे हे सोडुन राजकीय गटारगंगेत उतरणे हे दुर्दैव आहे.आज अयोध्येच्या राम मंदिरात डाका,दरोडा पडतोय आणि हजारो,करोडोंची लुट होत आहे म्हणजेच राजकारण आणि धार्मिकतेचे काॅकटेल झाले असुन भक्तांच्या भक्तीमध्ये विष ओतले जात आहे.संत, पुजारी कुण्या थराला गेले हे देशाचे दुर्दैवआहे.देशाच्या नेतृत्वाला काळीमा फासणारे कार्य आहे.साधू,संत,योगी,
बाबांची मंदिरावर नियुक्ती सत्तेतून केली जात आहे,त्यांनी फक्त जनतेला धर्मांध अंध्दश्रध्देच्या नशेच्या गोळ्या देत रहावे.जेणे करून जनता मुळ गरजा,समस्याकडे दुर्लक्षीत व्हावे हा एक धुर्त राजकीय हेतू आहे.प्रचार आणि अफवा या हत्याराने जनतेच्या विवेकावर रोज वार केले जात आहे.यांना मुबलक दक्षणा दिली जात आहे,भक्तांना आकर्षित केले जात आहे,करोडो रुपयांचे सतसंग,धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात आहे.
त्या व्यासपिठावरून राजकीय प्रसिध्दीही केली जात आहे.
आज समाज पर्वताच्या कडेवर आहे तो कधी कोसळेल आणि संपेल हे सांगता येत नाही.
*जनतेला मग वालीच नाही*
*ती घेण्या मग आणि सर्वहि*
*भस्म होईल सगळी मही*
*हाहा:कारे*||
जनतेला तेव्हाच्या त्यांच्या विचारांतून आणि आजच्या वर्तमानात कुणी वाली नाही.
फक्त सत्तेचा माज,मस्तीची
प्रवृत्ती दिसते आहे.हिच गती अधोगतीला जाऊन मिळणार आहे आणि समाजात,देशात हाहा:कार माजून सारे भस्म होणार आहे.कारण अति तिथे माती हि निश्चितच होणार हा इतिहास आहे.जनता आज
पेटण्याची,यल्गारपुकारण्याची,बंड पुकारण्याची,रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.
एकदा जनता पेटली तर सारेच भस्म होऊन जाईल याचे गांभीर्य सरकारला नाही.वेळ येणार नक्की तुकडोजी महाराजांची वाणी खरी ठरणार.आज सरकार आणि प्रशासन हे भ्रष्टाचाराच्या नाण्याच्या दोन बाजू ठरल्या आहेत तेव्हा शेवटी जनतेचा पैसा हा जनते ऐवजी त्यांच्यासाठीच जादा खर्च होत आहे.
*नसतील ऐकत जे जे कोणी*
*त्यांना कायद्याने घ्यावे आटपोनि*
*मग रचना करावी समानगुणी*
*इमान जागी ठेवोनिया||*
या तुकडोजी महाराजांच्या विचाराच जनहिताच्या मोठा संदर्भ आहे.किमान न्याय मिळण्याचा शेवटचा पर्याय जनतेत समानता आणण्याचा एकमेव मार्ग कायदा याने न्याय मिळवून द्यावा.पण इथे हे विपरीत घडत आहे आणि सत्तेच्या जोरावर घडवले जात आहे,इथे कायदाच सत्तेते ताब्यात घेतला आहे.
कायदा हा सत्तानुरूप निर्णय घेत आहे.इमान हा शब्दच बेईमान झाला तर सामान्यांना कुठून लाभणार?कायदा आज सत्तेच्या पायाखाली आहे.
न्यायालयातील न्यायदेवता ही आता त्यांच्याच अधिकाराखाली काम करत आहे.सगळे निकाल धनदांडग्यांच्या,सत्ताधिशांच्या बाजूनेच देत आहे.जनतेला फक्त कोर्टाच्या चकरा माराव्या लागतात.कधी-कधी तक्रारदार मरुन जातो पण तारीख काही येत नाही,निकाल काही लागत नाही.बापाप्रमाणे पुत्रासम वागणुक मिळावी तर इथे शत्रू सारखी मिळते.
के.पी.बिराजदार, तुरोरी
धाराशिव
उपसंपादक
विश्वविनायक न्युज रिपोर्टर तथा साहित्यिक






