नळदुर्ग नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी ८ तर नगरसेवक पदासाठी १८९ उमेदवारी अर्ज दाखल
——————————————————
नळदुर्ग (एस.के. गायकवाड ):
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखे दिवशी म्हणजे दिनांक १७ नोव्हेंबर २o२५ रोजी नगराध्यक्ष पदासाठी एकूण ८ अर्ज तर नगरसेवक पदासाठी विविध प्रभागातून एकूण १८९ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे
या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक १० नोव्हेंबर २o२५पासून नामनिर्देशन अर्ज भरण्याला सुरुवात झाली असता दि.१३ नोव्हेबर रोजी फक्त १ उमेदवारी अर्ज दाखल झाला होता तर दि.१४ नोव्हेंबर रोजी ५ उमेदवारानी नगर सेवक पदासाठी उमेदवारी दाखल केले होते. तसेच दि १५ नोव्हेंबर रोजी बेगवेगळ्या प्रभागतुन एकून ११ उमेदवारानी नगरसेवक पदासाठी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. दिनांक १६ व १७ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग येऊन शेवटी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखे दिवशी म्हणजेच दिनांक १७ नोव्हेंबर रोजी एकूण नगरसेवक पदासाठी १८९ अर्ज दाखल झाले असून नगराध्यक्ष पदासाठी एकूण आठ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत त्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे अशोक जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गतचे संजय बताले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मेहबूब शेख, एमआयएमचे शहबास काझी भाजपाचे अप्पासाहेब धरणे व इतर असे मिळून आठ उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी आपले नाम निर्देशन दाखल केले आहे.असे असले तरी अर्ज काढून घेण्याच्या शेवटच्या तारखे नंतर खऱ्या अर्थाने या निवडणुकीतील चित्र स्पष्ट होईल.







