Best News Portal Development Company In India

प्रभाग क्रमांक 3″बालाजी तट”वादळ”घराघराचा संपर्क मोहीम जोरात-तरुण उमेदवाराच्या कामाचा मतदारावर ठसा

प्रभाग ३ मध्ये “बालाजी तट” वादळ; घराघरांचा संपर्क मोहीम जोमात – तरुण उमेदवाराच्या सामाजिक कामांचा मतदारांवर ठसा!

तुळजापूर : प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक तीन मध्ये पारंपारिक धाकधुकीच्या प्रचारापेक्षा तरुण उमेदवार बालाजी तट यांनी राबवलेली घरोघरी संवाद व व्यक्तिगत संपर्काची मोहीम प्रचंड गतीने सुरू असून मतदारराजाच्या मनात वेगळी छाप पाडण्यात ते यशस्वी ठरत आहेत.

सामाजिक कार्यातून निर्माण झालेलं आपुलकीचं नातं, प्रभागातील अडचणी सोडवण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न आणि प्रत्येक कुटुंबाशी असलेला जिव्हाळा – या सर्वाचा परिणाम म्हणून बालाजी तट यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

पहिल्याच खेपेत राजकारणात उतरलेल्या या तरुण चेहऱ्याने प्रभाग क्रमांक तीनमध्ये आपली दमदार लढत उभी केली आहे. महाविकास आघाडीतील अनेक मोठे नेते तट यांच्या मागे ठामपणे उभे राहिले असून संपूर्ण शहराचे लक्ष या रंगतदार लढतीकडे लागले आहे.

जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः प्रभागात येऊन सभा घेऊन वातावरण तापवले तर त्यांच्या सौ भाग्यवतींनी महिलांमध्ये तट यांच्यासाठी प्रचार करून महिलांची मने जिंकली आहेत. त्यामुळे महिला मतदारांमध्ये तट यांचे नाव जोरदार चर्चेत आले आहे.

दरम्यान, काही दिग्गजांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव तंत्र वापरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असली तरी प्रभागातील नागरिकांचा ठाम विश्वास आणि बालाजी तट यांची जिद्द यांच्यासमोर ते सर्व निष्प्रभ ठरले.

प्रभाग क्रमांक तीनमध्ये “नवीन चेहरा, नवीन जिद्द आणि विकासाची नवी आशा” या प्रतिमेने बालाजी तट यांची लाट जोर धरत असून पुढील दोन दिवसांत प्रचाराचा वेग अधिक वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.प्रभाग ३ मध्ये बालाजी तट – बदलाच्या वाऱ्याने वेग घेतलेलं तरुण नेतृत्व!

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india