नळदुर्ग नगर परिषदेचा नगराध्यक्ष कोण भाऊ आप्पा अण्णा की भाई : उत्सुकता शिगेला निकाल लांबणीवर गेल्याने उमेदवारा मध्ये धाकधुक वाढीस, नगराध्यक्ष व नगरसेवकाचा फैसला ईव्हीएम मशीन मध्ये सीलबंद,७३ टक्के झाले मतदान
——————————————————–
नळदुर्ग ( एस.के.गायकवाड ):
धाराशिव जिल्ह्यात सर्वांचे लक्ष केंद्रित केलेल्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार भाऊ,आप्पा, अण्णा, की भाई याकडे सर्वांचे लक्ष लागले असून नराध्यक्ष पदाचा व नगरसेवक पदाचा फैसला ईव्हीएम मशीन मध्ये शिल बंद झाला असून ७३ टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क.दि.३ डिसेंबरचा निकाल लांबणीवर गेल्याने उमेदवारामध्ये धाकधुक वाढली असून जनतेची उत्सुकता शिगेला पोहंचली असून आता लक्ष २१ डिसेंबरकडे लागले आहे.
नळदुर्ग नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २o२५ च्या निवडणुकीत १ नगराध्यक्ष व २o नगर सेवक निवडीसाठी दि.o२ डिसेंबर २o२५ रोजी एकून १० प्रभागातून मतदान घेण्यात आले. सर्व प्रभागातून ७३ % मतदान झाले असून लागलीच दि. o३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती परंतू ऐनवेळी निवनुक आयोगाने निकालाची तारीख लांबवून २१ डिसेंबर केल्यामुळे दि.३ डिसेंबरच्या निकाल्याच्या उत्सुकतेवर विरजन पडलेअसून निकालाची उत्सुकता वाढीस लागली असून उमेदवारा मध्ये मात्र धाकधुक निर्माण झाली आहे.
दि. २१ डिसेंबरला नगराध्यक्ष पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार न.प. च्या सत्तेची सूत्रे कोणत्या पक्षाच्या हातात राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नळदुर्ग नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व शिवसेना (उबाठा ) महाविकास आघाडी कडून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उद्योजक अशोक भाऊ जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाकडून संजय अण्णा बताले तर भाजपा शिव सेना (एकनाथ शिंदे ) महायुती कडून भाजपाचे बसवराज आप्पा धरणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मेहबूबभाई शेख तर एम आय एम कडून माजी नगराध्यक्ष शहबाज काजी व अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असून अरोप प्रत्यारोप करत एका पेक्षा एक वरचड सभा घेवून निवडनुकीचे वातावरण तापवले होते.मतदाराना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी अनेक प्रलोभने दाखविण्यात आली होती. प्रत्येक पक्ष नळदुर्ग शहराचा आम्हीच विकास करणार असा दावा करत प्रचारामध्ये रंगत आणली होती. डिजिटल मीडियाचा सुद्धा प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात वापर झाला होता. एकूणच निवडणुकीचे वातावरण ताउन सुलाखून निघाले होते.अशा परिस्थितीमध्ये दि.२ डिसेंबर रोजी उत्स्फूर्तपणे मतदारांनी मतदान ही केले दि.३ डिसेंबरला निकाल लागणार होता. सगळ्यांनी गुलाल खरेदीची तयारी केली होती.पण ऐन वेळेला निकालाची तारीख लांबल्याने सगळ्यांच्याच उत्सुकतेवर विरजण पडले आणि सर्व मतदार नागरिक राजकीय मान्यवरांनाआता तर्कवितर्क काढत दि.२१ डिसेंबर २o२५ ची वाट बघत बसण्याची वेळ आली आहे. शेवटी नळदुर्ग नगर परिषदेच्या अध्यक्ष पदी आप्पा भाऊ अण्णा की भाई हे दि २१ डिसेंबर रोजीच ठरणार आहे.






