आरपीआय (आठवले) गटाची धाराशिव येथे ७ सप्टेंबरला महत्त्वाची जिल्हा बैठक; विविध विषयांवर होणार चर्चा!
तुळजापूर प्रतिनिधी:-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची महत्त्वपूर्ण जिल्हा बैठक येत्या ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता शासकीय विश्रामगृह (पोलीस मुख्यालय समोर), धाराशिव येथे आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक महाराष्ट्र राज्याचे जॉईंट सेक्रेटरी मा. राजाभाऊ ओहाळ साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष मा. विद्यानंद बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
बैठकीतील प्रमुख विषय:
पक्ष वर्धापन दिन: ३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्याचे नियोजन.
बौद्ध धम्म परिषद: १४ ऑक्टोबर २०२६ रोजी कोल्हापूर येथे आयोजित भव्य बौद्ध धम्म परिषदेच्या तयारीचा आढावा.
पक्षप्रवेश: जिल्ह्यातील शेकडो नवीन पदाधिकाऱ्यांचा पक्षात अधिकृत प्रवेश.
प्रमुख उपस्थिती-
या बैठकीस राज्य सचिव मा. संजयकुमार बनसोडे, राज्य सदस्य मा. एस. के. चेले, मराठवाडा कार्याध्यक्ष मा. आनंद पांडागळे, मराठवाडा उपाध्यक्ष मा. भागवत शिंदे, मराठवाडा सचिव मा. बंडूभाऊ बनसोडे, मराठवाडा उपाध्यक्ष मा. तानाजी कदम, मराठवाडा कार्यकारिणी सदस्य मा. हरीष डावरे, आणि मराठवाडा उपाध्यक्ष मा. पोपट लांडगे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
उपस्थित राहण्याचे आवाहन:
सदरील बैठकीस धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुका आणि विविध आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन रिपब्लिकन फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष मा. भाऊसाहेब मस्के, जिल्हा सरचिटणीस मा. सिद्धार्थ ओव्हाळ, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब म्हस्के, जिल्हा सचिव एस के गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष मा. रणजीत गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष मा. सोमनाथ गायकवाड आणि तालुकाध्यक्ष मा. भालचंद्र कठारे यांनी केले आहे.





