Best News Portal Development Company In India

नांदेड येथील बौद्ध तरुण हत्या प्रकरणातील आजची शिक्षा देण्यात यावी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( A) धाराशिव

नांदेड येथील बौद्ध तरुण हत्या प्रकरणातील आरोपींचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले
पक्षाची मागणी
———————————————————-
नळदुर्ग (एस.के. गायकवाड ) : दि .४ डिसेंबर २o२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे नांदेड येथील मिलिंद नगर परिसरातील बौद्ध समाजातील तरुण सक्षम ताटे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींनचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याना फाशीची शिक्षा देण्यात यावी या संदर्भात निवेदन देण्यात आले.
नांदेड येथील मिलिंद नगर परिसरात राहणारा बौद्ध समाजातील तरुण सक्षम ताटे याचे तीन वर्षापासून हिंदू ( सवर्ण ) समाजातील आंचल मामीडवार या मुलीशी प्रेम संबंध होते. या दोघांच्या प्रेमाला आंचल मामीडवारचे वडिल गजानन व भावांचा विरोध होता . सक्षम ताटे हा बौद्ध असल्यामुळे व तो खालच्या जातीचा असल्यामुळे आंचल आणि सक्षम याच्या लग्नाला मामीडवार कुटुंबीयांचा विरोध होता. आंचल मामीडवारचा भाऊ आंचलला जबरदस्तीने सक्षम ताटे याच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार करण्यास घेऊन गेला परंतु तेथे आंचल मामीडवारने सक्षमच्या विरोधात तक्रार देण्यास नकार दिला ,त्यावेळी तेथील पोलीस अधिकारी यांनी सक्षम ताटेचा खून करण्याचा सल्ला आंचल मामीडवारच्या भावांना दिला. आणि त्यामुळे दिनांक २७ नोव्हेंबर २o२५ रोजी नांदेड येथील गजानन मामीडवार , त्यांची दोन मुले व त्यांचे इतर सहकारी यांनी सक्षम ताटे याला चहा पिण्यास घराबाहेर बोलवून जातीय द्वेष भावनेतून सक्षम ताटे या तरुणाची गोळ्या झाडून व दगडाने ठेचून हत्या केली.
या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी व खून करण्याचा सल्ला देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून त्यांना या प्रकरणात सह आरोपी करण्यात यावे ,पीडित कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घेऊन ,५o लाख रुपयाचे शासकीय अनुदान द्यावे. कुटुंब उदरनिर्वाहासाठी पाच एकर शेतजमीन देण्यात यावी , अशा स्वरूपाच्या मागण्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने करण्यात आल्या. याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे तालुकाध्यक्ष भालचंद्र कठारे , जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ गायकवाड, सदस्य संदीप अंकुशराव ,सामाजिक कार्यकर्ते उमाजी गायकवाड ,समाधान सरवदे ,मारुती अंकुशराव आदींची उपस्थिती होती.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india