Best News Portal Development Company In India

नळदुर्ग नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकी अखेर धरणे आप्पा यांचा दणदणीत विजय: नळदुर्ग न. पा. भाजप महायुतीचे निर्विवाद बहुमत.

नळदुर्ग नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडनुकीत अखेर धरणेआप्पा यांचा दणदणीत विजय : नळदुर्ग न.प. वर भजपा महायुतीचे निर्विवाद महुमत
——————————————————–
नळदुर्ग ( एस.के.गायकवाड ):
धाराशिव जिल्ह्यात सर्वांचे लक्ष केंद्रित केलेल्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार भाऊ,आप्पा, अण्णा, की भाई याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर दि. २१ डिसेंबर २o२५ रोजी मतमोजनी होऊन नळदुग न.प. नगराध्यक्ष पदी भाजपा महायुतीचे बसवराज धरणे (आप्पा ) विरोधकाना धुळ चारत प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत.
नळदुर्ग नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २o२५ च्या निवडणुकीत १ नगराध्यक्ष व २o नगर सेवक निवडीसाठी दि.o२ डिसेंबर २o२५ रोजी एकून १० प्रभागातून मतदान घेण्यात आले होते. या मतदानाचा निकाल दिनांक २१ डिसेंबर २o२५ रोजी लागला असून नगराध्यक्षपदी भाजपा महायुतीचे उमेदवार बसवराज धरणे आप्पा यांनी विरोधकांना धूळ चारत प्रचंड बहुमताने जनतेतून विजय संपादन केलं असून या निवडणुकीत २o नगरसेवक पदासाठी १० प्रभागातुन घेण्यात आलेला मतदाना प्रक्रियेतून १२ जागा ह्या भाजपा महायुतीला मिळल्या तर राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीला केवळ आठ जागेवर समाधान मानावे लागले.
एकूणच नगरपरिषदचा निकाल पहाता या नगर परिषदेवर भाजपा महायुतीला निर्विवाद स्पष्ट बहुमत मिळालेआहे.बहुमत मिळाल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणूकीने फटाक्याचीअतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india