गुलबर्गा येथील ऐतिहासिक सिद्धार्थ बुद्ध विहाराच्या प्रांगणात नामदार रामदास आठवले साहेब यांचा मिठाई वाटून वाढदिवस संपन्न
————————————————–
नळदुर्ग ( एस.के.गायकवाड):
देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारता मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक नामदार रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस संबंध महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर संघर्ष दिन म्हणून साजरा होत असतानाच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के व जिल्हा सचिव एस.के.गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्या समवेत गुलबर्गा येथील ऐतिहासिक सिद्धार्थ बुद्ध विहाराच्या प्रांगणात मिठाईवाटून नामदार रामदास आठवले. साहेबांचा वाढदिवस संपन्न केला.
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध भूमी देहूरोड पुणे येथे दि.२५ डिसेंबर १९५४ रोजी सर्वप्रथम बुद्ध मूर्तीची स्थापना करून भारतात बौद्ध धम्म पुनर्जीवित केले.व दि.२५ डिसेंबर १९२७ रोजी रायगडच्या पायथ्याशी महाड या ठिकाणी क्रांती भूमीत मनुस्मृतीचे दहन करून विषमतावादी व्यवस्था जाळून टाकली आणि गुलामगिरीचे जीवन जगणाऱ्या माणसाला गुलामगीरीतुन मुक्त केले.या मानव मुक्ती दिनाचे व बुद्धमूर्ती स्थापनेच्या मंगलमय दिनाचे औचित्य साधून मेसाई जवळगा तालुका तुळजापूर येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के यांच्या नेतृत्वाखाली गुलबर्गा येथील ऐतिहासिक सिद्धार्थ बुद्ध विहारास जाऊन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बुद्ध विहाराच्या समोर प्रांगणात नामदार रामदासजी आठवले साहेब यांचा मिठाई वाटून वाढदिवस साजरा करण्यात आला.
प्रारंभी येथील ऐतिहासिक बुद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध व डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब म्हस्के यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की सिद्धार्थ बुद्ध विहारात आल्याने मनाला फार मोठे समाधान वाटले असून ऐतिहासिक वास्तू पाहून आम्ही भारावून गेलो आहे.या ठिकाणाहून बाबासाहेबांचा आणि तथागताचा मानवतेचा संदेश घेऊन आम्ही जात आहोत.
या प्रसंगी नामदार रामदास आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना क्रांतिकारी शुभेच्छा देवून मिठाई वाटून वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी आरपीआयचे जिल्हा सचिव एस. के.गायकवाड अनंद कोळी विश्रांताबाई मस्के, महानंदा मस्के,चंदूबाई गायकवाड, उंबराबाई मस्के,जयश्री गवळी सुप्रियाताई मस्के,केशरताई मस्के, लालूबाई मस्के,हारुबाई मस्के,सावित्राबाई वाघमारे, चित्राबाई मस्के,सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






