Best News Portal Development Company In India

मानवाने आपले जीवन असेपर्यंत सुखी समाधानी जगावे अशी शिकवण तथागत भगवान गौतम बुद्ध देतात; भंते महाविरो थेरे

मानवाने आपले जीवनमान असेपर्यंत सुखी समाधानी जीवन जगावे अशी शिकवण तथागत भगवान गौतम बुद्ध देतात : भंते महाविरो थेरो
—————————————————–
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
पुनर्जन्म ही एक खुळी कल्पना असून माणसाला पुनर्जन्म नाही तेंव्हा याचं जन्मी माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागून जोपर्यंत आपले जीवनमान आहे तोपर्यंत सुखी समाधानाने जिवण जगावे अशी मानवतेची शिकवण बौद्ध धम्माच्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्ध देतात तेंव्हा माणसाने आपले जीवनमान असे पर्यंत सुखी समाधानाने जिवन जगले पाहिजे असे प्रतिपादन पूज्य भन्ते महाविरो थेरो यानी तुगाव येते बोलताना केले.
उमरगा तालुक्यातील तुगाव येथे दहाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख धम्मदेशना (प्रवचन ) देताना भंते महाविरो थेरो बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की मानवाला दुःखातून मुक्त करणे हा धम्माचा हेतू आहे.दु:खाचे मुळ कारण तृष्णा आहे. बुद्धांनी तृष्णा मुक्तीचा मार्ग दाखविला असून तृष्णेनेतून सुटका झाली की दुःख मुक्तीचा मार्ग सापडतो. धम्म काया वाचा मनाने शुद्धता शिकवतो. जो आपल्या कर्मावर स्मृतीपूर्वक लक्ष ठेवतो तोच खरे धम्म जीवन जगतो राग द्वेष मोह हे मनाचे विकार असून मानवाने प्राणी हिंसा करणे, खोटे बोलणे, मादक पदार्थाचे सेवन करणे, चोरी करणे आदी बाबीना तिलांजली देऊन पारलौकिक जीवनाचा आनंद घ्यावा असा उपदेश त्यानी शेवटी दिला. याप्रसंगी भंते धम्मसार थेर,भंते सुमंगल,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे, जि.प.माजी सभापती हरिष डावरे,रिपाइं चे राज्य कार्यकारणी सदस्य एस.के. कांबळे (चेले),जि.प.माजी सदस्य दिलीप भालेराव प्रा.एस. एम.गायकवाड,मिलिंद कांबळे गुरुजी उमापूरकर, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, रिपाइं उमरगा तालुका अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड,दगडू भोसले रिपाइं तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे,डॉ.सिद्धोधन कांबळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून पूज्य भंते यांच्या हस्ते धम्म ध्वज फडकविण्यात आला.
या परिषदेचे प्रास्ताविक स्वागत अध्यक्ष भालचंद्र लोखंडे यांनी केले तर सूत्रसंचालन गुंडू कांबळे यांनी केले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी परिषदेचे अध्यक्ष शाहूराज भोसले,प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे,सचिन बनसोडे,शरद कांबळे,राजकुमार कांबळे, संकल्प कांबळे,छाया बगाडे,बलभीम गायकवाड,धर्मेंद्र कांबळे,सचिन बनसोडे,सागर भोसले,नंदकुमार गायकवाड, गोपाळ सुरवसे,सुदर्शन कांबळे, अमृता कांबळे,विद्याचंद कांबळे, नीलकंठ कांबळे,दत्ताभाऊ कांबळे,धर्मा बनसोडे,विशाल कांबळे,लोकेश कांबळे,आकाश कांबळे,सुरज गायकवाड, सुधाकर गायकवाड, शिवाजी कांबळे,दिगंबर कांबळे,काना जाधव,आदींनी परिश्रम घेतले यावेळी तुगाव व परिसरातील बौद्ध उपासक उपासिका कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india