नळदुर्ग येथे विविध ठिकाणी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन
—————————————————-
नळदुर्ग ( एस.के.गायकवाड):
नळदुर्ग तालुका तुळजापूर येथे दि.०१ जानेवारी २०२६ रोजी नूतन वर्षाभिनंदन व भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दि.०१ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगाव येथे भीमा नदी काठी झालेली पेशवाई विरुद्धची लढाई ही महार सैनिकांच्या दृष्टीने एक आत्म सन्मानाची लढाई होती.या लढाईत जरी महार सैनिक इंग्रजांच्या बाजूने लढले असले तरी त्यांना इथल्या व्यवस्थेने दिलेल्या अपमान जनक पशुही वागणुकीचा बदला घेण्याची आणि आत्मसन्मान व अभिमानाची ही लढाई होती.
या लढाईमध्ये २८ हजार पेशवे सैनिका विरुद्ध फक्त ५०० महार सैनिक अशी ही संघर्ष मय लढाई झाली या लढाईत २८ हजार पेशवे सैनिकांचा खात्मा करून ५०० महार सैनिकांनी ही लढाई जिंकली.त्यांच्या विजयाचे प्रतिक म्हणून इंग्रज सरकारने भीमा कोरेगाव नदी काठी विजय स्तंभ बांधलेला आहे.या विजयी स्तंभास महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्य हायातीत दर वर्षी मानवंदना देण्यासाठी येत असत.त्याचाच भाग म्हणून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते,आंबेडकरी अनुयायी दर वर्षी भिमा कोरे गावा विजयी स्तंभाला मानवंदना देण्यासाठी लखोच्या संख्येने येतात.गावो गावी या निमित्ताने अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.आंबेडकरी चळवळीत दि.०१ जानेवारी हा दिवस नुतन वर्षा बरोबरचं शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो.
दि.०१ जानेवार या शौर्य दिनाचे औचित्य साधुन नळदुर्गं येथिल भीम नगर मध्ये प्रतिकात्मक भीमा कोरेगाव विजयी स्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून उपस्थित भीमसैनिकांनी मानवंदना दिली याप्रसंगी नगरसेवक मारुती खारवे,माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल बापू बनसोडे माजी सैनिक विद्याधर वाघमारे , बौध्दाचार्य दादासाहेब बनसोडे,युवा कार्यकर्ते योगेश सुरवसे, गणेश दुरुगकर सह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच बौद्ध नगर येथे महापराक्रमी ५०० शुर वीरांना व त्यांच्या शौर्याला मानवंदना देण्यात आली या वेळी डिबीएन सामाजिक विकास संघटना तुळजापूर तालुका अध्यक्ष उमेश गायकवाड सामाजिक कार्यकर्ते पप्पु कांबळे, सुनील भांगे,संभाजी कांबळे, विकास बनसोडे,संमबुद्ध गायकवाड
सह कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच येथील समस्त भीमसैनिकांच्या वतीने नळदुर्ग बसस्थानकासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात शौर्य दिना निमित्ताने भीमा कोरेगाव येथील आत्मसन्मानाच्या लढाईत शहीद झालेल्या सर्व महार सैनिकांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकाच्या नामफलकासं पुष्पहार अर्पण करून उपस्थित भीमसैनिकांनी अभिवादन केले. या प्रसंगी नूतन नगर सेवक मारुती खारवे,रिपाइं (आठवले)धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, माजी सैनिक मधुकर लोखंडे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.






