Best News Portal Development Company In India

विकासात्मक मुद्द्यावर आपण होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आपण पूर्ण ताकतीनिशी लढणार: आमदार राणा दादा पाटील

विकासात्मक मुद्द्यावर आपण होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका संपूर्ण ताकतिनीशी लढविणार : आमदार राणा दादा पाटील
——————————————————
नळदुर्ग ( एस.के. गायकवाड ):
भारतीय जनता पार्टी च्या वतीने महायुतीच्याच माध्यमातून आपण होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद गटातून आणि पंचायत समिती गणातून विकासात्मक मुद्यावर आणि कार्यकर्त्यांच्या बळावर संपूर्ण ताकदीनिशी निवडणुका लढविणार असून कार्यकर्त्यांनी संपूर्ण तयारीनिशी या निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करावा व धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये भाजपा महायुतीची सत्ता प्रस्थापित करावी असे आवाहन तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा धाराशिव जिल्ह्याचे भाजपा नेते माजी मंत्रीआमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना केले.
धाराशिव जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद गटातून व पंचायत समिती गणातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांचा येथील तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रांगणात धाराशिव जिल्हा भाजपाच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना लोकप्रिय आमदार राणाजगजीतसिंह पाटील बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की केंद्रात आणि राज्यात भाजपा व मित्र पक्ष महायुतीची सत्ता असून नुकतंच पार पडलेल्या नगर परिषदा निवडणुकीत ही भाजपा महायुतीचेच प्राबल्य दिसून आलेले आहे.धाराशिव जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नातूनच आपण फार मोठे यश संपादन केले आहे. त्याच धर्तीवर आपण आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नातून ही निवडणूक विकासात्मक मुद्द्यावर संपूर्ण ताकतिनीशी लढविणार असून कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सबके साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्त्वावर होत देशात,. राज्यात आणि जिल्ह्यात होत असलेल्या विकासात्मक कामाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जायचं आहे एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा होत असलेल्या आणि हो पुढे होणाऱ्या विकासात्मक कामाच्या मुद्यावर आपण ही निवडणूक लढवायची आहे.
या प्रसंगी भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते सुरेश देशमुख,जिल्हा अध्यक्ष दाताभाऊ कूलकर्णी, माजी जिल्हा अध्यक्ष नितीन काळे, युवा नेते शरण पाटील आदींची ही भाषणे झाली.
या प्रसंगी , नळदुर्ग न.प. चे नगराध्यक्ष बसवराजआप्पा धरणे, तुळजापूर नगराध्यक्ष पिटू भैया गंगणे,सह जिल्ह्यातील जि.प. गरातून व प.स. गणातून भाजपा च्या वतीने निवडूक लढविण्यास इच्छुक असलेले सर्व इच्छूक उमेदवार,पाधाधिकारी कार्यकर्ते,युवा कार्यकर्ते मोठ्य संख्येने उपस्थित हाते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india