भाजपाने उमेदवारी दिल्यास खुदावाडी पंचायत समिती गणातून पुर्ण ताकतीने निवडणूक लढवून जिंकुन दाखवू : वागदरी येथील किशोर सुरवसे याचा आत्मविश्वास
—————————————————–
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
महाराष्ट्रात होऊ घातलेल्या १२ जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जि.प.गट अंतर्गत येणाऱ्या खुदावाडी पंचायत समिती गणातून भाजपाने उमेदवारी दिल्यास जनतेचा विश्वास संपादन करून पूर्ण ताकतीनिशी निवडणूक लढवून जिंकून दाखवू असा आत्मविश्वास वागदरी तालुका तुळजापूर येथील युवा कार्यकर्ते किशोर लक्ष्मण सुरवसे यांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केला.
किशोर सुरवसे हे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये खुदवाडी पंचायत समिती गणात शंभर एक महिलांचे ऑनलाईन फॉर्म भरले.
अतिवृष्टीच्या काळात गणातील सर्व शेतकऱ्यांची फॉर्म भरून प्रशासन कडे त्याचा पाठपुरावा केला.
सर्व वयोवृद्धांचे निराधारांच्या आडी अडचणी त्यांच्या घरापर्यंत जाऊन सोडवण्याचा प्रयत्न केला व करित आहेत.
सर्व प्रकारच्या KYC घरी बोलावून करून दिल्या.
आमदार राणा दादाच्या नेतृत्वाखाली वागदरी गावामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करून जवळपास ८५ लोकांच्या आरोग्याची तपासणी करून घेतली.
भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियानामध्ये सहभाग घेऊन खुदावाडी गणातून सर्वाधिक सदस्य नोदनी केली. सध्या भारतिय जनतापार्टीच्या मंडळ सरचिटणीस व तालुका उपाध्यक्ष पदी कार्यरत आहेत.
एकंदरीत त्यांच्या कार्याचा विचार केला असता भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष किशोर सुरवसे यांनाच भाजपाने उमेदवारी दावी असी मागणी जनतेतून जोर धरत असल्याचे समजते.






