नळदुर्ग येथे रिपाइं (आठवले) वतीने अजित दादा पवार यांना श्रद्धांजली
——————————————————
नळदुर्ग (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री राजकीय चळवळीतील एक धाडसी व्यक्तिमत्व नामदार अजित दादा पवार यांच्या दुःखद निधनाबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने नळदुर्ग तालुका तुळजापूर येथे भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
दिनांक २८ जानेवारी २o२६ रोजी सकाळी ८.३o दरम्यान महाराष्ट्राचे लाडके नेते एक धुरंदर आणि कार्यकुशल नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांचे बारामती विमानतळा जवळ विमान अपघातामध्ये दुःखद असे निधन झाले.त्यांच्या दुःखद निधनाबद्दल नळदुर्ग येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीला धावून जाणारा सर्वसामान्य लोकांना,सर्व जाती धर्मातील लोकांना समान न्याय देणारं महाराष्ट्राच जाणतं आणि धाडसी असं नेतृत्व काळाच्या पडद्याआड झाल असून त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय चळवळीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.अशा भावपूर्ण शब्दात उपस्थित कार्यकर्त्यांनी दादांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी रिपाइं (आठवले) चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, रिपाइंचे जिल्हा
सचिव एस. के. गायकवाड, रिपाइं नळदुर्ग सर्कल प्रमुख राजेंद्र शिंदे,रिपाइं (आठवले) अल्पसंख्यांक आघाडी चे तालुका अध्यक्ष बाशीदभाई कुरेशी, कलीम शेख,अकबर शेख, मेहबूब शेख, इनुस इनामदार,राजेंद्र साखरे सह कार्यकर्ते उपस्थित होते.






