धाराशिव जिल्ह्यात उद्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा रणसंग्राम
प्रचाराचा थरार संपला, प्रशासन सज्ज; मतदारांचा कौल कोणाला मिळणार?
तुळजापूर | प्रतिनिधी
== = = = = = = = = = = = = = = = =
धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाची पुढील दिशा ठरवणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका साठी उद्या मनदान होत . असून, या निवडणुकांचा थरार आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. जोरदार प्रचार, आरोप-प्रत्यारोप, राजकीय डावपेच आणि गावोगावी रंगलेली चर्चा यामुळे संपूर्ण जिल्हा निवडणूकमय वातावरणात बुडून गेला आहे. प्रचाराचा तोफा थंडावल्या असल्या तरी, मतदारांच्या मनात मात्र आजही राजकीय घडामोडींची उत्सुकता कायम आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये उद्या सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू होणार असून, या निवडणुकांसाठी प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि निवडणूक कर्मचारी पूर्णतः सज्ज झाले आहेत. मिनी मंत्रालयाची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याचा फैसला उद्या मतपेटीत बंद होणार आहे.
“प्रचाराचा ‘हाय व्होल्टेज’ शेवट”
गेल्या काही आठवड्यांपासून धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागात निवडणूक प्रचाराने अक्षरशः उधाण आणले होते. प्रमुख राजकीय पक्ष, आघाड्या, स्थानिक नेते तसेच अपक्ष उमेदवार यांनी प्रचारासाठी अखेरच्या क्षणापर्यंत ताकद पणाला लावली. गावागावात सभा, चौकाचौकात बैठका, घरोघरी भेटी, वाहन रॅल्या, पदयात्रा यामुळे ग्रामीण भागातील शांतता काही काळासाठी राजकीय गदारोळात बदलली होती.
शेतकरी प्रश्न, पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सुविधा, शिक्षण, महिला सक्षमीकरण, युवकांचा रोजगार हे मुद्दे प्रचारात ठळकपणे पुढे आले. काही ठिकाणी मात्र वैयक्तिक टीका, जुने वाद आणि स्थानिक राजकारणातील अंतर्गत संघर्षही उफाळून आले. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वातावरण चांगलेच तापले
होते. तरी मतदारांनी योग्य तो निर्णय घेऊन मतदान करावे !








