Best News Portal Development Company In India

वागदरी येथे संत तुकाराम महाराज गाथा पारायण व महाशिवपुराण कथा ज्ञानयज्ञ सप्ताह सुरू!

वागदरी येथे संत तुकाराम महाराज गाथा पारायण व महाशिवपुराण कथा ज्ञानयज्ञ सप्ताह सुरुवात
—————————————————
नळदुर्ग ( एस. के. गायकवाड):
तुळजापूर तालुक्यात सर्वत्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच वागदरी ता.तुळजापूर येथे मात्र लोकशाहीच्या उत्सवाबरोबरच ह.भ.प. राजकुमार पाटील यांच्य आभिष्ठानाखाली श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण व महाशिवपुराण कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली असून या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण व महाशिवपुराण आणि सामुदायिक विवाह सोहळा, श्री संत भवान सिंग महाराज भजनी मंडळ वागदरी व समस्त ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि.२ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी २o२६ दरम्यान श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण व महाशिवपुराण कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे व सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.
. दि.२ फेब्रुवारी २o२६ पासून रीतसर या सप्ताहाची सुरुवात झालेली असून दिनांक २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान दररोज सकाळी काकड आरती नंतर श्री संत तुकाराम महाराज गाथा वाचन केले जाते तर दुपारच्या दरम्यान ह.भ.प.मधुकर .नांदरे महाराजांच्या अधिपत्याखाली महाशिवपुराण कथा वाचन व संध्याकाळी कीर्तन प्रवचन आणि हरिजागराचा कार्यक्रम अशा पद्धतीने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे. या सप्ताहाचीसोमवार दि.९ फेब्रुवारी २o२६ रोजी ह.भ.प. श्रीहरी ढेरे महाराजांच्या काल्याच्या कीर्तने या सप्ताहाची सांगता होणार आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india