Best News Portal Development Company In India

वागदरी येथील मतदान केंद्रावर ६३.८३% मतदान ; लोकशाहीचा उत्सव शांततेत पार पडला!

वागदरी येथील मतदान केंदावर ६३.८३% मतदान शांततेत
————————————————
नळदुर्ग ( प्रतिनिधी ):
तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे जिल्हा परिषद नंदगाव गट व या गटांतर्गत येणाऱ्या खुदावाडी पंचायात समिती गणाचे प्रतिनिधी निवडीसाठी येथील मतदान केंद्रावर मतदान अत्यंत शांततेत व खेळी मेळीच्या वातावरणात पार पडले.
सकाळी ठिक ७.३० वा. दरम्यान येथील जि.प.प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली.सकाळी लवकर शेती कामावर जाणारे कामगार, शेतकरी,कामा निमित्ताने बाहेर गावी जाणारे मतदार यानी आपला मतदानाचा हक्क बजावून गेले. संत गतीने सुरूवात झालेल्या मतदानाला दुपारी दोन नंतर गती आली. विशेष म्हणजे महिला मतदारांची गर्दी मतदान केंद्रावर झाली. त्यानंतर जस जसी मतदानाची वेळ संपत येईल तस तसे पुरुष मतदारानी मतदान केंद्रावर गर्दी केली.विशेषता तरुण मतदारानी लोकशाही उत्सवाचा आनंद घेतला.येथील एकून १०२३ मतदारा पैकी ६२४ मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला.यात ३३० पुरुष तर २९४ स्त्री मतदारानी मतदाना केले.एकंदरीत वागदरी येथिल मतदान केंद्रावर ६o.९९ % मतदान झाले असून नंदगाव जि.प. गटात सरासरी ६०% मतदान झाले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india