येडोळा येथे माई रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
————————————————–
नळदुर्ग (एस.के.गायकवाड ):
तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा येथे त्यागमूर्ती माई रमाई भिमराव आंबेडकर यांची १२८ वी जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.
. येथील सिद्धार्थ युवा कला व क्रीडा मंडळ आणि रमाई महिला मंडळाच्या वतीने त्यागमूर्ती महामाता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महामाता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांचा हस्ते करून समता सैनिक दलांचे पुणे जिल्हा लेफ्टनंट कर्नल एम.डी. लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिकरित्या बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.
. या.प्रसंगी येथील रामचंद्र लोंढे, सुरेश लोंढे, देवानंद लोंढे, मारुती लोंढे, डॉ.सुरज लोंढे, अमित लोंढे,अंकूश लोंढे, प्रविण कांबळे सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.






