शिक्षणाला प्राधान्य देऊन बालविवाह मुक्त गावे करु — दयानंद काळुंके
—————————————-
जळकोट (अरुण लोखंडे ) आपल्या गावात कोणत्याही मुलाचे किंवा मुलीचे अल्पवयात विवाह होणार नाही यासाठी सर्वांनी संकल्प करुन मुलगी शिकली तर घर उभं राहत, बालविवाह करणे हा गुन्हा आहे आणि मुलांच्या भविष्यासाठी घातक आहे,आपण शिक्षणाला प्राधान्य देऊन बालविवाह मुक्त गावे करु असे आवाहन धाराशिव जिल्हा बालकल्याण समितीचे सदस्य तथा पत्रकार दयानंद काळुंके यांनी व्यक्त केले
अणदूर येथील जवाहर महाविद्यालयाच्या वतीने रामतिर्थ येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीरामध्ये मार्गदर्शन करताना दयानंद काळुंके हे बोलत होते
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे, सरपंच फुलाबाई राठोड, धाराशिव जिल्हा चाईल्ड लाईन हेल्प लाईन कक्षाचे विकास चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा बनसोडे, डॉ संतोष पवार, डॉ जोगदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती
जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अमोल कोवे बोलताना म्हणाले की बालविवाहामुळे शिक्षणातील पडणारा खंड, आरोग्यावरील होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी बालविवाह रोखणे गरजेचे आहे, बालविवाहाची चाहुल लागल्यास १०९८ या नंबर ला फोन करावे असे आवाहन त्यांनी केले
यावेळी गावातून बालविवाह प्रतिबंधक रॅली काढून, पोस्टर प्रदर्शन,घोषणा गाणी या माध्यमातून जनजागृती करण्यात आली
यावेळी चाईल्ड हेल्प लाईन कक्षाचे प्रमुख विकास चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा बनसोडे, डॉ मिना जाधव, डॉ अनिता मुदकन्ना यांनी यावेळी मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ सुर्यकांत आगलावे यांनी केले, सुत्रसंचलन डॉ दयानंद कांबळे यांनी तर आभार डॉ फुलचंद दुधभाते यांनी मानले
यासाठी जवाहर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उमाकांत चनशेट्टी, उपप्राचार्य डॉ मल्लीनाथ लंगडे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी, ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता






