वागदरी येथे शिवजयंती निमित्त आयोजित शिव सप्ताहाची भव्य मिरवणुकीने सांगता.
——————————————————-
नळदुर्ग ( एस.के. गायकवाड):
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्ताने वागदरी तालुका तुळजापूर येथे आयोजित शिव सप्ताहाची भव्य मिरवणुकीने सांगता करण्यात आली.
. येथील शिव-बसव-राणा व श्री संत काशिबा महाराज जन्मोत्सव मंडळ वागदरी ता.तुळजापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शिव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या शिव सप्ताहमध्ये विविध विषयावर व्याख्यान, महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांसाठी बुद्धिमत्ता स्पर्धा परीक्षा,मुलांच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम,भोजनदान अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन जन्मोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.या शिव सप्ताहाची सांगता दि.१९ फेब्रुवारी २o२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते महात्मा बसवेश्वर, महाराणा प्रताप व संत काशीवा महाराज यांच्या प्रतिमांची पालखीतून भव्य मिरवणूक काढून सांगता करण्यात आली. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अँड.अमोल पाटील,प्रमोद बिराजदार,योगेश सुरवसे,अमोल गोगावे,मंडळाचे अध्यक्ष प्रशांत यादव, उपाध्यक्ष रवी यादव, सचिव भरतसिंग ठाकूर, मिरवनुक प्रमुख रामसिंग चव्हाण, रमेश पवार, श्रीकार धुमाळ आदीनी परिश्रम घेतले.यावेळी गावतील समस्त ग्रामस्थ,महिला, युवा कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.






