Best News Portal Development Company In India

ना.रामदास आठवले यांचा २६ फेब्रुवारी रोजी धाराशिव जिल्हा दौरा; विविध ठिकाणी भेटी व मार्गदर्शन !

ना.रामदास आठवले यांचा २६ फेब्रुवारी रोजी धाराशिव जिल्हा दौरा; विविध ठिकाणी भेटी व मार्गदर्शन !
तुळजापूर :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोटनुसार, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री मा. डॉ. रामदासजी आठवले हे गुरुवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ११:०० वाजता ते लातूर रेस्टहाऊस येथे आगमन करणार असून, त्यानंतर दुपारी १२:०० वाजता टाका तालुका औसा येथील अंकिता पोटेळे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. पुढे दुपारी १२:३० वाजता धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे बौद्धवासी सुभाष कांबळे, भिमनगर यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट देण्यात येणार आहे.
यानंतर दुपारी १:३० वाजता किल्लारी साखर कारखाना रेस्ट हाऊस येथे भोजनाचा कार्यक्रम होईल. दुपारी २:४५ वाजता आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेस उपस्थित राहून मा. आठवले मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ते अहमदपूरकडे प्रस्थान करणार असल्याचेही कळते.
या दौऱ्यात मा. आठवले यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे जॉईंट सेक्रेटरी मा. राजाभाऊ ओहोळ, राज्य सचिव मा. चंद्रकांत दिवटे, राज्य सचिव मा. संजयकुमार बनसोडे तसेच जिल्हाध्यक्ष मा. विद्यानंद बनसोडे ,जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब म्हस्के अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य मा. एस. के. बेटे, मराठवाडा कार्याध्यक्ष मा. आनंद पंडागळे, मराठवाडा सचिव मा. बबनराव बनसोडे, मराठवाडा उपाध्यक्ष मा. भगवान शिंदे, मराठवाडा उपाध्यक्ष मा. पोपट लांडगे, तसेच मराठवाडा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. हरीश डावरे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
या दौऱ्यानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) धाराशिव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उमरगा येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष मा. विद्यानंद बनसोडे व जिल्हा सरचिटणीस मा. सिद्धार्थ ओहोळ यांनी केले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india