उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
दि.१६ मार्च २०२६ रोजी लहुजी शक्ती सेना उमरगा तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय उमरगा मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनांतील विषय :- अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी दिनांक १६ मार्च २०२६ रोजी आझाद मैदान मुंबई येथे सत्याग्रह आंदोलनाबाबत.
१) सर्वोच्च न्यायालयाचा निकाल भारतीय सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला आहे या निकालामुळे आरक्षणापासून वंचित राहिलेल्या देशभरातील खऱ्या वंचित घटकांना न्याय मिळण्याची अशा निर्माण झाली आहे.
२) समितीचा विलंब या ऐतिहासिक निकालाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सरकारने ‘न्यायमूर्ती अनंत पदर समिती’ दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी स्थापन केली आहे परंतु या समितीचे अध्यक्ष आपला अहवाल शासनास सादर केलेला नाही.
३) वारंवार मुदतवाढ: शासन स्तरावरून या समितीला वारंवार मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर समितीची मुदत १४ मार्च २०२६ रोजी संपत आहे. तरीही महाराष्ट्र शासनाने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा ठोस निर्णय घेतलेला नाही.
४) वंचित घटकावरील अन्याय: शासनाच्या या उदासीन धोरणामुळे अनुसूचित जातीतील लाभ-वंचित जात घटकावर मोठा अन्याय होत आहे खऱ्या उपेक्षित समाजाला आरक्षणाचा लाभ मिळण्यास विलंब होत आहे.
५) आंदोलनाची घोषणा या अन्यायाविरुद्ध आणि आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ लागू व्हावे या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक १६ मार्च २०२६ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे ‘एक दिवशीय सत्याग्रह आंदोलन’ करण्यात येत आहे.
प्रमुख मागण्या महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती अनंत बदर समितीकडून तात्काळ अहवाल प्राप्त करून घ्यावा आणि अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ लागू करून खऱ्या वंचित व उपेक्षित जात घटकांना आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा यासाठी निवेदन सादर करण्यात आले.
त्यावेळी लहुजी शक्ती सेना उमरगा तालुका अध्यक्ष- विजय भाऊ तोरडकर , दिलीप बापू गायकवाड, छायाताई नाईकवाडे, सुधाकर भाऊ बनसोडे, अलकाताई कांबळे, बळी भाऊ मोरे, रोहित भाऊ वाघमारे, चंद्रकांत भाऊ देडे, काशिनाथ भाऊ गायकवाड, सविताताई बोईने, सविता ताई गायकवाड, लिंबाबाई देडे, पल्लवी गायकवाड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.







