.लढवय्या पँथर शंकर कांबळे यांच दुःखद निधन
—————————————————
नळदुर्ग (एस.के.गायकवाड ):
दहिटणा ता. तुळजापूर येथील लढाय्य पँथर,भिमशाहीर गायरान जमिनीच्या लढाईतील विजयाचे एक शिलेदार आंबेडकरी चळवळीतील खंबीर आणि अष्ठपैलू नेतृत्व शंकर कांबळे यांचे दि.१६ मार्च २o२६ रोजी रात्री ९.०० वा. दरम्यान अल्पशा आजाराने वयाच्या ६७ व्या वार्षी दुःखद निधन झाले.
. नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली वादळी दलित पँथर च्या चळवळीतील एक धाडसी कार्यकर्ते म्हणून शंकर कांबळे हे सर्वत्र परिसरात परिचित होते. तसेच राजरत्न गायन पार्टी दहिटणा चे हार्मोनियम (पेटी ) वादक, गायक, झेलकरी कलावंत होते.आपल्या पहाडी आवाजातून बुद्ध -फुले -शाहू- आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार भीम गीत गायनाच्या माध्यमातून करणारा एक भिमशाहिर म्हणूनही त्यांची वेगळी ओळख होती.
नामदार रामदास आठवले साहेब यांच्या वादळी दलित पॅंथरच्या चळवळीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन त्यांच्या एकूणच सामाजिक राजकीय आणि धम्म चळवळीला सुरुवात केली होती. दरम्यानच्या काळात “कसेल त्याची जमीन,राहील त्याचं घर, नसेल त्याचं काय”
या विचारातून भूमिहीन दलित कुटुंबांना त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी किमान कोरडवाहू चार एकर जमीन किंवा दोन एकर बागायत जमीन शासनाने द्यावी या मागणीसाठीचा लढा सबंध महाराष्ट्रभर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या माध्यमातून कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चालू होता. त्या नंतर भारतीय दलित पँथार च्या माध्यमातून नामदार रामदास आठवले साहेब यांनी तो सुरू ठेवला आणि आजही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून हा लढा सुरूच आहे.या गायरान जमिनीच्या लढ्यामध्ये शंकर कांबळे यांनी आपल्या कार्यकर्त्यासमवेत धाडसाने.सहभाग घेतला आणि तुळजापूर तालुक्यातील आपल्या गावी दहिटणा येथील शिवारात असलेल्या शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण करून ती जमीन दलित भूमिहीन कुटुंबांना त्यांच्या उदरनिर्वासाठी कसून खाण्याकरता मिळाली पाहिजे यासाठी ची लढाई सुरू केली आणि नामदार रामदास आठवले साहेब व धाराशिव ( उस्मानाबाद) जिल्ह्याचे स्थानिक पातळीवरिल नेतृत्व यांच्या माध्यमातून हा लढा यशस्वी झाला. या मध्ये त्यांचे मोठे बंधू माजी सैनिक मेजर वसंत कांबळे यांचा ही मोठा अधार होता. सर्वांच्या सहभागातून हा गायरान जमिनीचा लढा यशस्वी झाला.आणि दहिरणा येथिल भुमिहीन दलित कुटुंबांना जमीन मिळाली. ते जमीनदार झाले.यागायरान जमिनीच्या यशस्वी लढाईतील एक शिलेदार म्हणजे शंकर कांबळे.
. त्यांच्या दुःखाद निधना बद्दल त्याना भावपूर्ण श्रद्धांजली.






