Best News Portal Development Company In India

शिक्षक हा उत्कृष्ट समाज निर्मितीचा शिल्पकार आहे – विनायकराव पाटील. तलमोड आनंद सुर्यवंशी!

शिक्षक हा उत्कृष्ट समाज निर्मितीचा शिल्पकार आहे – विनायकराव पाटील.
तलमोड आनंद सुर्यवंशी.
गुरुकूल शिक्षण प्द्धती मध्ये गुरु शिष्यांच्या नात्यांचा आदर केला जात होता. त्या काळी गुरुंना सन्मानाची वागणूक दिली जात होती. बदलत्या काळानुसार शिक्षण व्यवस्थेत बदल होत गेल्याने गुरू शिष्यांच्या नात्याचे अंतर वाढू लागले आहे. इतर शासकिय सेवांच्या तुलनेत शिक्षकांना दुय्यम वागणूक दिली जात आहे. शिक्षण क्षेत्र हे पवित्र क्षेत्र आहे. शिक्षक हा समाजातील उत्कृष्ट समाज निर्मितीचा शिल्पकार आहे. शिक्षकांचा सन्मान झाला पाहिजे. असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक तथा श्रमजीवी शिक्षक प्रसाक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी केले.
येथील श्रमजीवी अध्यापक महाविद्यालयातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्या साठी निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन आदर्श महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले होते . या वेळी अध्यक्षीय समारोप प्रसंगी विनायकराव पाटील बोलत होते. प्राचार्य डॉ. राम सोलंकर , प्राचार्य डॉ.विजयकुमार सरपे , प्रा. डॉ. प्रवीण कदम , प्रा. भाऊ पवार ,प्रा. देविदास चव्हाण , प्रा. तेजस्वीनी करंडे,प्रा. अमोल इंगळे, यांची प्रमुख उपस्थिती होती. गेल्या ४५ वर्षा पूर्वी केवळ डि.एड,बी.एड . मुळेच श्रमजीवी शिक्षण संस्थेची पाया भरणी झाली आहे. श्रमजीवी डि.एड,बी.एड च्या वतीने महाराष्ट्राच्या विविध जिल्हयाला हजारो आदर्श शिक्षक दिले आहेत. श्रमजीवीच्या आदर्श शिक्षक पॅटर्नची परंपरा अखंडीत ठेवा असे अवाहन त्यांनी केले. समाज घडविणाऱ्या शिक्षकां कडेच समाजाचे व सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करताना पाटील पुढे म्हणाले कि- पोलीस , महसूल ,महावितरण , आरोग्य , या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकिय कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली जाते. मात्र समाज घडविणाऱ्या शिक्षकां कडे शासनाचे व समाजाचे दुर्लक्ष होत आहे. परपंरे पासून उत्कृष्ट व सुसंस्कारीत समाज घडविणाऱ्या शिक्षकांचा आदर झाला पाहिजे अशी अपेक्षा पाटील यांनी केली.
या वेळी बोलताना प्राचार्य डॉ. राम सोलंकर म्हणाले कि – संस्थेचे अध्यक्ष विनायकरावजी पाटील , माजी मंत्री तथा संस्थेचे सरचिटणीस बसवराजजी पाटील , चिटणीस रामकृष्णपंत खरोसेकर व सर्व संचालकांच्या अथक परिश्रमातून श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचा सर्वांगीण शैक्षणिक विकास झाला आहे. सर्व सामान्यांच्या मुलांमुलीना श्रमजीवी शिक्षण संस्थे मुळे उत्कृष्ट शिक्षणाची संधी मिळाली आहे. श्रमजीवी डि.एड.बी.एड. च्या माध्यमातून गेल्या पंचेवीस वर्षात हजारो शिक्षक विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य करित आहेत. शिक्षकांवर सामाजिक जबाबदारी वाढली आहे. शिक्षकांनी ज्ञानदानाची सामाजिक जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन देशाच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवंत पिढया घडविण्या साठी पुढे येण्याची गरज आहे.गुरुमंत्र हा जीवनाला समृद्ध करतो. गुरुनी आपल्या ज्ञानार्जनातून समाजातील अंधश्रध्दा, अनिष्ठ रुढी परंपरा , अज्ञान नाहीसे करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. आदर्श समाज निर्मिती करिता अव्हाने खूप असली तरी शिक्षक आपल्या अनुभवाच्या व ज्ञानाच्या बळावर आदर्श समाज निर्मिती साठी पुढाकार घ्यावा. शिक्षक हे ईश्वरा प्रमाणे असल्याने शिक्षकांचा नेहमी आदर झाला पाहिजे. असे अवाहन प्राचार्य डॉ. सोलंकर यांनी केले.
या वेळी प्रा.डॉ. प्रवीण कदम ,प्रा. देविदास चव्हाण, यांची शुभेच्छा भाषणे झाली. प्रसाद धावारे , वैष्णवी जाधव , नागराज पालापुरे , साधना जाधव या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. देविदास चव्हाण यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. अमोल इंगळेयांनी केले.प्रा.तेजस्वीनी करंडे यानी आभार मानले. कार्यक्रमा साठी विद्यार्थी , प्राध्यापक मोठ्या संख्येनि उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india