Best News Portal Development Company In India

जहागीर चिंचोली येथे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचे भूमिपूजन; शरण पाटील यांच्या हस्ते शुभारंभ तुरोरी दमयंती भालेराव.

जहागीर चिंचोली येथे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचे भूमिपूजन; शरण पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
तुरोरी दमयंती भालेराव.

तालुक्यातील जहागीर चिंचोली येथे शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन विधानसभा समितीचे सह-अध्यक्ष शरण बसवराज पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. या योजनेअंतर्गत एकुंडी ते बेणेतुरा नदीपर्यंतच्या सुमारे चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर बळीराजाला आपल्या शेतापर्यंत सहज पोहोचणे शक्य होईल, तसेच तयार झालेला शेतमाल वेळेवर आणि सुरक्षितपणे बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
याप्रसंगी बोलताना शरण बसवराज पाटील यांनी ठाम विश्वास व्यक्त केला की, येत्या काळात शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचे जाळे उमरगा आणि लोहारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात विस्तारेल, ज्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाची समस्या कायमची दूर होईल.

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, दिलीप भालेराव ( माजी गटनेता – जिल्हा परिषद धाराशिव) माजी पंचायत समिती सदस्य भास्कर शिंदे, रामलिंग बिराजदार, उपसरपंच विठ्ठल गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण मदनसुरे, डी.सी.सी. बँक चेअरमन राजेंद्र मोरे, ग्रामपंचायत सदस्य श्री. नितीन ब्याले, योगेश राठोड, इंद्रजीत ब्याले, महेश पाटील, साहजी साळुंके, संजय सुरवसे, गोविंद कोठारे, श्रीकृष्ण राठोड, गणपत कोठारे यांच्यासह गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विकासकामामुळे जहागीर चिंचोली परिसरातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india