Best News Portal Development Company In India

स्त्री व पुरुष म्हणजे सायकलची दोन चाके असतात सह दिवाणी न्यायाधीश सौ जी पी बनकर!

व पुरुष म्हणजे सायकलची दोन चाके असतात
सह दिवाणी न्यायाधीशस्त्री सौ जी पी बनकर.
तुरोरी दमयंती भालेराव.
उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये तालुका विधी सेवा समिती उमरगा व विधीज्ञ मंडळ उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालविवाह प्रतिबंधक कायदा व आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सह दिवाणी न्यायाधीश सौ जी पी बनकर बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर विधीज्ञा सौ.एफ के खान,विधीज्ञा यु आर शेंडगे सौ.अपचे मॅडम मुख्याध्यापक पद्माकर मोरे शिक्षण तज्ञ सदानंद शिवदे पाटील डी सी कांबळे, के.एस.चिखले उपस्थित होते. पुढे बोलताना न्यायाधीश सौ बनकर म्हणाल्या की आज देशात महिलांनी खूप मोठी प्रगती केलेली आहे प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत क्रीडा असेल शिक्षण असेल किंवा उद्योग व्यापार असेल या सर्व क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे सामाजिक सलोखा राखला पाहिजे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत असताना महिलांसाठी भरपूर कायदे तयार होत आहेत परंतु पुरुषांची भूमिका पण अत्यंत महत्त्वाची आहे समाजात वावरत असताना स्त्री आणि पुरुष म्हणजे सायकलची दोन चाके आहेत स्त्रीया सायकलचे मागच्या चाका प्रमाणे संसाराचे ओझे वाहताना सायकलच्या पुढील चाकाप्रमाणे योग्य मार्ग दाखवण्याचे काम पुरुष करत असतात.यावेळी बालविवाह प्रतिबंधक कायद्याची सखोल माहिती विधीज्ञा सौ.एफ के खान यांनी उपस्थिताना दिली. त्या म्हणाल्या की मुलाचे वय 21 तर मुलीचे वय 18 वर्षे असेल तरच लग्न कायद्याने मान्य होते अन्यथा कमी वयात लग्न करणे म्हणजे बालविवाह करणे असा अर्थ होतो बालीवर रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने पुढे आले पाहिजे मुलांनी आपल्या घरात शेजारी गल्लीमध्ये किंवा परिसरात बालविवाह होत असतील तर सामाजिक संघटना शाळेचे मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना येऊन सांगितले पाहिजे या कायद्याबद्दल सर्व स्तरावर जनजागृती होणे काळाची गरज आहे लहान वयात लग्न करून अनेक समस्यांना तोंड देण्यापेक्षा मुलीला सज्ञान होऊन लग्न केले तर दोन्ही घराचा उद्धार होईल बालविवाह होत असतील तर समाजातील व्यक्तींनी अशा बालविवाहाला उपस्थित राहू नये अशा बालविवाला उपस्थित राहणे म्हणजे बालविवाहाला समर्थन देणे होईल आणि आपणही कायद्याने दोषी ठरणार आहोत बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 बद्दल जनजागृती करणे काळाची गरज आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पद्माकर मोरे सूत्रसंचालन भाग्यश्री पंडित तर आभार अँड शिवम स्वामी आणि मानले कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india