उमरगा तालुक्यातील तलमोड व जगदाळवाडी येथे शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या शेत पाणंद रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन.
तलमोड आनंद सुर्यवंशी.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच शेतीमालाची वाहतूक सुलभ व्हावी, या उद्देशाने या पाणंद रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे.
तलमोड येथे तांड्यापासून ते सुभाष बिल्लो राठोड यांच्या शेतापर्यंत सुमारे १ किलोमीटर लांबीचा पाणंद रस्ता करण्यात येत असून, यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सहज पोहोचता येणार आहे. विशेषतः पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होऊन शेतीमालाची वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.
तसेच जगदाळवाडी येथे नॅशनल हायवे क्र. ६५ पासून शिंदेवाडीमार्गे जगदाळवाडीपर्यंत शेत पाणंद रस्ता तयार करण्यात येत आहे. या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारपेठेत नेणे सोपे होणार असून, गावातील शेतीविकासाला देखील मोठी चालना मिळणार आहे. अशा प्रकारचे उपक्रम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून, शेती व ग्रामीण विकासाला बळकटी देणारे आहेत.
या भूमिपूजन प्रसंगी परिसरातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप भालेराव, जि.प सदस्य रफिक तांबोळी, योगेश राठोड, माजी पंचायत समिती सभापती सचिन पाटील, बसवराज कस्तुरे, अनिल सगर, पंचायत समितीचे सदस्य दगडू मोरे, हरिभाऊ जाधव, सदानंद पाटील, आकाश पाटील, सौ. संगीता पाटील, राहुल हेबळे, मल्लिनाथ स्वामी, अजय मोरे, नंदी जगदाळे, श्दामू चव्हाण, दामोदर चव्हाण, मंगेश कस्तुरे, शाहूराज भोसले, कुमार पवार, शंकर जाधव, तुकाराम मंगाळे, ओमकार गुरव, आकाश स्वामी, बसवराज स्वामी, दशरथ राठोड, विक्रम राठोड, लक्ष्मण राठोड, गणेश जाधव, विनोद राठोड, आकाश राठोड, दिनकर जगदाळे, रावस जगदाळे, बाजीराव जगदाळे, मोहन भगत, दौलतराव मोटे, सुधाकर जगदाळे, विठोबा जगदाळे, लखन मोरे, श्रीराम जगदाळे, सौ. कलावती मारुती जमादार, रावासाहेब जगदाळे, बालाजी चव्हाण, आनंद हाक्के, अजय मोरे, बालाजी पाटील, महेश कुरनुरे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, भविष्यातही ग्रामीण भागातील विकासासाठी अशा उपक्रमांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.









